सोलापूर – सोलापूर डिस्ट्रीक्ट चेस असोसिएशनच्या मान्यतेने चॅम्प चेस स्कूल व सोलापुर चेस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने खुली व महिला गटाच्या जिल्हास्तरीय निवड बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन रविवार १४ जुन रोजी सकाळी १० वाजता टाकळीकर मंगल कार्यालय, जुळे सोलापूर येथे करण्यात आलेले आहे.
या स्पर्धेत प्रथम येणाऱ्या चार मुले व मुलींची निवड कोल्हापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय बुद्धीबळ स्पर्धेसाठी करण्यात येणार आहे. निवड झालेल्या प्रत्येक खेळाडूंना रु. १०००, मेडल व ‘स्वाद चषक’ देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेत एकूण ५० बक्षिसे देण्यात येणार असून १५, ११ व ८ वर्षाखालील गटात प्रत्येकी पाच उत्तेजनार्थ पारितोषिके ठेवण्यात आलेली आहे. स्पर्धेसाठी रु. २०० प्रवेश फी ठेवण्यात आलेली असुन निवड झालेल्या सर्व खेळाडूंची बक्षिसाची रक्कम राज्यस्तरीय स्पर्धा खेळून आल्यानंतर देण्यात येणार असल्याचे स्पर्धा संयोजक गणेश सावंत व सादिक नदाफ तसेच संस्थेचे सचिव व आंतरराष्ट्रीय पंच सुमुख गायकवाड व आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त अतुल कुलकर्णी यांनी सांगितले . इच्छुक खेळाडूंनी अधिक माहितीसाठी उदय वगरे मो.क्र. ८८८८०४५३४४ अथवा प्रशांत पिसे मो.क्र. ९१५६८१५९६३ यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन सोलापूर चेस अकॅडमीचे अध्यक्ष महेश धाराशिवकर व सोलापुर डीस्ट्रीक्ट चेस असोसिएशनचे अध्यक्ष खा. धैर्यशील मोहिते पाटील यांनी केले आहे.
Post Views: 7