सोलापूर :- येथील रहिवासी अल्लाऊद्दीन हसन अत्तार, वय-३८ वर्षे, रा.घर नं.६२ सरवदे नगर, मुळेगाव रोड यास पीडितेवर दुष्कर्म केलेप्रकरणीच्या गुन्ह्यात विशेष न्यायाधीश श्री.ए.आर.उबाळे साो यांनी जामीन मंजूर केला.
यात थोडक्यात हकीकत की, मे २०१५ ते नोव्हेंबर २०१५ पर्यंत पिडीता ही तिचे आई वडिलांचे घरी रहात असताना, आरोपीने पिडीतेस “मला तुझेशी बोलायचे आहे, मला तुझी आठवण येत आहे”, असे म्हणून पिडीतेशी जवळीक साधून पिडीतेची इच्छा नसताना पिडीतेसोबत शरीरसंबंध केले आरोपीपासून पिडीतेस अपत्य झाले, त्यानंतर आरोपीने पिडीतेस मारहाण करुन जीवे ठार मारण्याची धमकी दिली, त्यानंतर पिडीतेने घर बदलले त्यानंतरही आरोपीने पिडीतेसोबत वारंवार शरीरसंबंध केले अशा आशयाची फिर्याद पिडीतेने एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन येथे दाखल केली होती. सदर गुन्ह्यात आरोपीस अटक झालेली होती, त्यामुळे आरोपीने अॅड. गुरुदत्त बोरगांवकर यांचे मार्फत सोलापूर येथील सत्र न्यायालयामध्ये जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. सदर जामीन अर्जाची सुनावणी विशेष न्यायाधीश श्री.ए.आर. उबाळे साो यांचे कोर्टासमोर झाली, सदरकामी सरकारी वकीलांनी आरोपीच्या जामीन अर्जास तीव्र विरोध केला तथापि, आरोपीच्या वकीलांचा युक्तिवाद ऐकून मे. कोर्टाने आरोपीचा जामीन अर्ज मंजूर केला.
सदर प्रकरणात आरोपीतर्फे अॅड. गुरुदत्त बोरगांवकर, अॅड. देवदत्त बोरगांवकर, अॅड. शिवानी करवा, व सरकारतर्फे अॅड. शितल डोके यांनी काम पाहिले.
Post Views: 4