Thursday, March 5, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

ठाणे कारागृह बिल्डरांच्या घशात जाऊ देणार नाही – आ. केळकर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 30, 2024
in top news
0
ठाणे कारागृह बिल्डरांच्या घशात जाऊ देणार नाही – आ. केळकर
0
SHARES
25
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

ठाणे, 30 जून (हिं.स.) सुमारे ३०० वर्षांचा इतिहास असलेला आणि भारतीय स्वातंत्र्याचा साक्षीदार असलेला ठाणे किल्ला अर्थात सध्याचे कारागृह स्थलांतरीत करण्याचा बिल्डर लॉबीचा डाव ठाणेकर यशस्वी होऊ देणार नाहीत. हा निर्णय शासनाने तत्काळ मागे घ्यावा, अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी करताच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांना जाहीर पाठिंबा दिला. या पाठिंब्यामुळे अधिवेशनात साऱ्यांच्या भुवया उंचावल्या.

ठाणे किल्ला अर्थात सध्याचे ठाणे कारागृह भिवंडीत हलवून किल्ल्याच्या जागी भव्य पार्क उभे करण्याच्या हालचाली सुरू झाल्यानंतर ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांनी या निर्णयास विरोध केला. ठाणे कारागृह भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा साक्षीदार असून येथे इंग्रजांनी पेशव्यांचे पहिले कारभारी त्र्यंबकजी डेंगळे यांना डांबून ठेवले होते. त्यानंतर आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांना येथे फाशी देण्यात आली. तर पुढील काळात कान्हेरे, कर्वे आणि देशपांडे यांना फाशी देण्यात आले होते. या कारागृहात अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी तुरुंगवास भोगला आहे. त्या आधी पोर्तुगीजांच्या अन्याय सत्तेचा बीमोड करून चिमाजी अप्पा यांनी ठाणे कारागृह म्हणजे पूर्वीचा ठाणे किल्ला मुक्त केला होता. अशी ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले ठाणे कारागृह ठाणेकरांची अस्मिता असून त्याचा एक दगडही ठाणेकर पाडू देणार नाहीत, यासाठी मोठी चळवळ उभारू अशी भूमिका आमदार संजय केळकर यांनी घेतली होती. कारागृहाच्या जागी पार्क उभारल्यानंतर बिल्डर लॉबीला रान मोकळे होणार असून त्यांच्या हितासाठी ऐतिहासिक ठेवा उद्ध्वस्त होऊ देणार नसल्याची भूमिकाही श्री. केळकर यांनी घेतली होती.

सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात श्री.केळकर यांनी हाच मुद्दा उपस्थित केला. या ऐतिहासिक किल्ल्यात म्युरल्सच्या रूपाने स्मारक उभारण्याची योजना प्रगतीपथावर असून शासनाने हा निर्णय मागे घ्यावा. कारागृह हलवण्याचा डाव ठाणेकर यशस्वी होऊ देणार नाहीत. मुख्यमंत्री हे ठाण्याचे असल्याने ते देखील ठाणेकरांच्या भावनांचा मान ठेवतील, असा विश्वास श्री.केळकर यांनी व्यक्त केला.

आमदार केळकर यांच्या मागणीला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पाठिंबा दिला. कारागृहाचा इतिहास मांडून कारागृह हलवण्याच्या निर्णयाला कडाडून विरोध केला. या पाठिंब्यामुळे मात्र ठाणे किल्ल्याच्या संवर्धनासाठी राजकीय विरोधाच्या भिंती पडल्याचे दिसून आले तर दुसरीकडे सभागृहाच्या भुवयाही उंचावल्या.

Post Views: 21
Previous Post

घोडबंदर रोड, नागला बंदर येथील हुक्का पार्लर, रेस्ट्रो बारवर ठाणे पालिकेची धडक कारवाई

Next Post

कोयना पुनर्वसन करंजवडे गावाला महसूल दर्जा तात्काळ द्या – आ. केळकर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
कोयना पुनर्वसन करंजवडे गावाला महसूल दर्जा तात्काळ द्या – आ. केळकर

कोयना पुनर्वसन करंजवडे गावाला महसूल दर्जा तात्काळ द्या - आ. केळकर

ताज्या बातम्या

येलदरी पुलावर पिकप कोसळली; एका युवकाचा मृत्यू. #acsident #viral #public

March 5, 2026

जळोली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची वार्षिक तपासणी.. #public #marathinews #solapurnews #viral

March 5, 2026

डबडबलेल्या डोळ्यांनी प्रा ज्योती वाघमारे म्हणाल्या .. विश्वास बसत नाही. #public #marathinews #viral

March 5, 2026

सोलापूरच्या कन्येला दिला राज्यसभेचा सन्मान :अमोल शिंदे. #shivsena #solapurnews #eknathshinde #viral

March 5, 2026

मराठ्यांवर झाला अन्याय म्हणत केले आंदोलन. #public #solapurnews #marathinews #maratha

March 5, 2026

वक्तृत्व ते … राजमार्ग प्रा. ज्योती वाघमारे राज्यसभेवर ….. #viral #public

March 5, 2026

शिवसेनेच्या झंझावाती नेत्या प्रा. ज्योती वाघमारे राज्यसभेवर जाणार. #public #solapurnews #shivsena

March 5, 2026

महसूल पथकाची कारवाई करताना कर्मचारी जखमी. #public #marathinews #crime #viral #public

March 5, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0716371

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697