पिलीव – माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील चैतन्य ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची40वी वार्षिक सर्वसाधारण सभा पत संस्थेचे विद्यमान चेअरमन रामचंद्र उर्फ नानासाहेब देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पतसंस्थेच्या कार्यालयात खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.
यावेळी पतसंस्थेचे सचिव रघुनाथ नरळे यांनी अजेंड्यावरील विषयाचे वाचन करून गेल्या 31मार्च 2025 या गतवर्षीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या कामकाजाची माहिती देऊन चालू वर्षाच्या 31 मार्च 2026 अखेरच्या ताळेबंद तेरीज पत्रक,जमा खर्च व नफा तोटा पत्रकाचे वाचन करून जमाखर्चाची माहिती दिली. यावेळी संस्थेची माहिती देताना संस्थेचे एकूण 670 सभासद असून संस्थेची वार्षिक उलाढाल 4 कोटी 52लाख 73 हजारांपेक्षा जास्त झाली असून जमा खर्च पाहता संस्थेस 2 लाख 18 हजार एवढा निव्वळ नफा झाला आहे. कर्जाची 55% एवढी वसुली झाली असून सध्याची संक्षेप ठेव तथा पिगमी दररोज 42हजार रुपये पेक्षा जास्त असून कर्ज मर्यादा 5 लाख एवढी ठेवली आहे . चालू आर्थिक वर्षात एकूण 67 लाख हजार हजार पेक्षा जास्त कर्ज वाटप केले असून सुमारे 59लाख रुपये कर्जाची वसुली झाली असून 55% कर्ज वसुली झाली आहे यावेळी पतसंस्थेच्या ऑडिटर नेमणुकीसाठी चार ऑडिटरचे अर्ज दाखल झाले होते .परंतु सध्याचे विद्यमान ऑडिटर अनिल सुखदेव खटावकर यांच्या कामाबद्दल संचालक मंडळांनी समाधान व्यक्त केले आहे चालू वर्षीच्या ऑडिटर पदी सौ जयश्री डोईफोडे यांचीच पुढील वर्षीच्या 31,मार्च 2027अखेर ऑडिटर म्हणून नियुक्ती करण्याचे सर्वानुमते ठरले. यावेळी संचालक अरिफ खान पठाण यांनी पतसंस्थेच्या पिग्मीमध्ये वाढ झाली पाहिजे ,सभासदानी सक्रिय राहून संस्थेच्या कामकाजात सहभागी होऊन कर्ज घेऊन वेळेत कर्जफेड केली पाहिजे व संस्थेचे हित जोपासले पाहिजे व कर्ज मर्यादित पाच लाखा रुपये पर्यंत ची वाढ करण्यात आली असल्याचे मनोगतात सांगितले .यावेळी दामोदर लोखंडे यांनी संस्थेच्या कामकाजाविषयी सकारात्मक मनोगत व्यक्त केले तर
यावेळी चेअरमन रामचंद्र उर्फ नानासाहेब देशमुख यांनी सभासदांचे आभार व्यक्त करताना थकबाकी असलेल्या सभासदांनी कर्जदारांनी कोर्ट कारवाई टाळण्यासाठी व संस्थेचे कामकाज सुरळीत चालून आर्थिक प्रगती साधण्यासाठी आपल्याकडे असणारी कर्जाची थकबाकी वेळेत भरण्याची आवाहन केले यावेळी चेअरमन रामचंद्र नानासाहेब देशमुख संचालक आरिफखान पठाण, डॉ. मिलिंद गुळभिले, संजय रोकडे,प्रभाकर वाघमारे ,जगन्नाथ करडे ,दामोदर लोखंडे, लक्ष्मण काळे,जीवन गुरव, विठ्ठल सदेवाले, सचिव रघुनाथ नरळे, इसाक बागवान, जिजाबा वाघमारे ,महादेव तावरे ,विठ्ठल पिसे, अतुल नष्ठे,बाळू भैस, गोविंद भैस,सौ मीनाक्षी देशमुख, नामदेवआप्पा देशमुख ,मारुती खटावकर ,विठ्ठल जाधव ,गणेश ढेकळे ,अशोक राजमाने आदी मान्यवर उपस्थित होते .
यावेळी कर्मचारी विठ्ठल जाधव, गणेश ढेकळे, अशोक राजमाने यांनी परिश्रम घेतले यावेळी सभासद व इतर मान्यवर उपस्थित होते
Post Views: 6