पिलीव – माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे दोन हायस्कूल व एक ज्युनिअर कॉलेज आहे .दोन्ही हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज भरण्याच्या व सुटण्याच्या वेळा ह्या वेगवेगळ्या आहेत. पिलीव येथील नवीन इमारतीत ज्युनिअर कॉलेज व आठवी ते दहावीपर्यंतचे विद्यालय आहे. यामध्ये ज्युनिअर कॉलेज सकाळी साडेसात वाजता भरते व साडे अकरा वाजता सुटते तर हायस्कूल अकरा वाजता भरुन पाच वाजता सुटते. यामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व रमेश खलीपे ज्युनिअर कॉलेज तसेच जवाहरलाल शेतकी विद्यालय शाळा ,सुटण्याच्या व भरण्याच्या वेळेत अस्ताव्यस्त, वेगळी स्टाईल असणारे तरुण जोर जोराने दुचाकी पळवितात. तर अनेक तरुण शाळा ,काॅलेज पासुन वेगवेगळ्या चौका चौकात थांबलेले पाहवयास मिळत आहेत. शाळा कॉलेज सुटल्यावर कर्ण कर्कश हॉर्न वाजवत हे रोडरोमिओ आपले लक्ष वेधून घेत आहेत. ते मुद्दाम शाळा _ सुटताना व भरताना भरधाव वेगाने गाडी पळवितात यामुळे खरेतर विद्यार्थ्यांमध्ये व पालकांमध्ये भितीचे वातावरण आहे. असे प्रकार दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. या रोडरोमिओचा पोलीस प्रशासनाने ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी पालकांमधुन होत आहे.यासाठी पोलीस प्रशासनाने शाळा ,सुटताना भरताना गस्त घालावी, वाहतुक नियंत्रण नियमाचे उल्लंघन करणारयावर ताबडतोब कारवाई करावी, शाळा परिसरात नो पार्किंग व वेग मर्यादा याबाबत स्पष्ट सुचना देणे आवश्यक आहे. पोलीस प्रशासनाने याकडे ताबडतोब गांभीर्याने लक्ष देऊन रोडरोमिओंचा ताबडतोब बंदोबस्त करण्याची मागणी पालकांमधुन होत आहेत.


















