Saturday, September 19, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

चॅट जीपीटीच्या माध्यमातून पुन्हा अवतरले ८०चे युग

तरुण भारतbyतरुण भारत
September 19, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
पंढरपूर – सध्याच्या धकाधकीच्या जीवनात दिवसांमागून दिवस आणि वर्षामागून वर्षे कशी निघून जातात हे कोणालाही कळत नाही. कोँणत्याही व्यक्तीला स्वत:च्या आयुष्यातील वर्तमाना बरोबरच भूतकाळ, आणि भविष्या बद्दल देखील जिज्ञासा असतेच. काळ झपाट्याने पुढे सरकत असतो. त्यामुळे चालू आयुष्या बरोबरच सरलेल्या आयुष्यातील गोड आणि कडू आठवणीच्या शिदोरीवरच प्रत्येकजण भविष्याचा वेध घेत असतो. यातच आयुष्यातील जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्यास प्रत्येकालाच आनंदच होतोच होतो.
सध्या एआय तंत्रज्ञानामुळे ही संधी प्रत्येकाला उपलब्ध झाली आहे. या तंत्रज्ञानामुळे ८०च्या दशकातील आपले रूप कसे होते, याचा जणू आरसाच सध्या एआयने समोर ठेवला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांपासून अगदी व्हीआयपी मंडळी, राजकारणी ते सेलिब्रिटी पर्यंत सर्वांचीच एआय तंत्रज्ञानाचा वापर करुन सोशलमिडीयाव्दारे आपले जुने रुप कसे होते हे न्हाळ्याची जणू स्पर्धाच सुरु असल्याचे सध्या दिसत आहे.
एकीकडे हे नवीन तंत्रज्ञान आपणाला नुसतेच छायाचित्रांच्या स्वरुपात त्या काळात घेऊन जाते. मात्र तो काळ प्रत्यक्ष अनुभविलेले, पाहिलेले अनेक जण मात्र त्या काळातील गोड आठवणींनी आज देखील गहिवररुन जातात. कारण तो काळ म्हणजे नवीन तंत्रज्ञानाची केवळ सुरुवात होती.. त्यामुळे आज जरी विविध तंत्रज्ञानाची निर्मिती झालेली असली तरी तंत्रज्ञानाने नुसती जुनी छायाचित्रे तयार होतात. मात्र तो काळ पुन्हा अनुभवता येण्याची किमया अजून तरी कोणत्याही तंत्रज्ञानातून तयार झालेले दिसत नाही. त्यामुळे केवळ त्या काळचे छायाचित्र पाहून त्या वेळच्या आठवणींच्या हिंदोळ्यावर पुढच्या आयुष्याची वाट धरावयाची.. ऐवढेच..
—————-
चौकट : ( संपुर्ण जग एक बनत आहे ग्लोबल खेडे )
आज संपूर्ण जग एक ग्लोबल खेडे झाले असून सोशल मीडियावर नवनवीन ट्रेंड व्हायरल होत आहेत. ८०-९०च्या दशकातील कपडे, घराची रचना, जुन्या काळातील फोटोसेशन आणि त्या वेळची जीवनशैली आजची तरुणाई एआयच्या माध्यमातून पुन्हा अनुभवत आहे. त्यामुळे जग एक जणू ग्लोबल खेडेच झाल्याचा आभास सोशलमिडीयावर निर्माण झाला आहे.
—————–
चौकट : (भूतकाळातील फोटो मिळतो पण त्या काळातील माणूसकीचे काय )
सोशल मीडियावर या जुन्या लूकचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. मात्र, या फोटोंमागे केवळ ट्रेंड नाही; एक हळवी आठवण आणि एक मोठा प्रश्न दडलेला आहे. आपण भूतकाळाचा फोटो एआयने तयार करू शकतो, पण त्या काळातील माणुसकी पुन्हा तयार करू शकतो का?
—————–
चौकट : ( फोटो म्हणजे संपुर्ण कुटुंबाची गोष्ट असायची )
८०-९०च्या दशकात प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात कैद होत नव्हता. वर्षातून एखाद्या लग्नात, सणाला किंवा कौटुंबिक कार्यक्रमात फोटो काढला जायचा. त्यामुळे एक फोटो म्हणजे केवळ चेहऱ्यांची प्रतिमा नव्हती; त्यामागे संपूर्ण कुटुंबाची गोष्ट असायची.
—————–
चौकट : ( तेव्हा ‘ऑनलाईन’ नव्हते; पण माणसे कायम ‘कनेक्टेड’ होती!)
आज जगाच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या व्यक्तीशी आपण क्षणात बोलतो; पण शेजारच्या खोलीत बसलेल्या आई-वडिलांशी बोलण्यासाठी वेळ नसतो. कनेक्टिव्हिटी वाढली; पण कनेक्शन कमी झाले.
—————–
(एक टीव्ही, एक अंगण आणि संपूर्ण कुटुंब! )
त्या काळात घरात एकच टीव्ही असायचा. कार्यक्रमाची वेळ झाली की घरातील सगळे एकत्र बसायचे. एकच खोली, एकच स्वयंपाकघर, एकच अंगण; पण त्यात अनेक माणसांचे हसणे, भांडणे, रुसवे-फुगवे आणि प्रेम सामावलेले असायचे. आज प्रत्येकाच्या हातात स्वतंत्र स्क्रीन आहे. घरे मोठी झाली, सुविधा वाढल्या; पण एकत्र बसण्याची जागा मात्र लहान झाली.
—————–
( पत्र उशिरा पोहोचायचे; भावना मात्र मनापर्यंत पोहोचायच्या!)
पोस्टमनची वाट पाहणे, पत्र उघडताना होणारी उत्सुकता आणि त्यातील प्रत्येक शब्द पुन्हा-पुन्हा वाचणे हा संवादाचा वेगळाच अनुभव होता. आज संदेश काही सेकंदांत पोहोचतो, पण उत्तर येत नाही. पूर्वी पत्र उशिरा पोहोचायचे; आज भावना पोहोचायलाच उशीर होतो.
—————–
(एआय जुन्या कपड्यांत दाखवते; पण जुनी नाती दाखवू शकते का?)
आज एआय आपल्याला ८०-९०च्या दशकातील रूप देत आहे. जुन्या घराच्या पार्श्वभूमीत उभे करते, त्या काळातील कपडे घालते. पण या कृत्रिम आठवणी आपल्याला एक सत्यही दाखवतात – ज्या काळाला आपण फोटोमध्ये शोधत आहोत, तो काळ आपल्या नात्यांमध्ये कुठेतरी हरवला आहे.
—————–
( तंत्रज्ञानाने वातावरण ८० चे दिले, पण माणुसकीचे काय ?)
पूर्वी पैसा, सुखसुविधा कमी होत्या पण आपुलकी, प्रेम, जिव्हाळा होता. कोणतीही अडचण आली तरी सर्वजण धावून जायचे. आज कोणी मयत झाले तरी खांदा द्यायला चार माणसेही सापडत नाहीत. एआय ट्रेंडने ८०चे वातावरण दिले, पण तशी माणसे मिळतील का? हाच खरा प्रश्न आहे.
—————–
(राजकीय नेत्यांनाही एआयची भुरळ )
सध्या सोशल मीडियावर ८०च्या दशकातील लाईफस्टाईलचा ट्रेंड धुमाकूळ घालत असून प्रचंड व्हायरल होत आहे. लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे. सामान्य लोक, मुली आणि महिला वर्गासह राजकीय नेते, आमदार, खासदारही गंमत म्हणून याचा अनुभव घेत आहेत. माढा मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील, आ. समाधान आवताडे, खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, माजी मंत्री राजेश टोपे आदींनी देखील आपला ८० मधील रेट्रो लूक व्हायरल केला आहे.
Post Views: 6
Previous Post

पांडुरंग ऊसभूषण पुरस्काराचे विलास कांबळे मानकरी

Next Post

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभाग सज्ज

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभाग सज्ज

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभाग सज्ज

ताज्या बातम्या

५ लाख वृक्षारोपणाचा टप्पा पूर्ण करणार

५ लाख वृक्षारोपणाचा टप्पा पूर्ण करणार

September 19, 2026
यलगुलवार, शेख, शिंदे, राठोड व आपुलकी प्रतिष्ठान यांना शांतता पुरस्कार जाहीर

यलगुलवार, शेख, शिंदे, राठोड व आपुलकी प्रतिष्ठान यांना शांतता पुरस्कार जाहीर

September 19, 2026

बार्शीतील दोघांवर ‘एमपीडीए’ अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई

September 19, 2026
श्री शमी विघ्नेश गणेश मंदिरात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या हस्ते पूजा

श्री शमी विघ्नेश गणेश मंदिरात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या हस्ते पूजा

September 19, 2026
 बार्शीतील चाटे समूहाचे  प्रा. पांडुरंग घाटगे यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार

 बार्शीतील चाटे समूहाचे  प्रा. पांडुरंग घाटगे यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार

September 19, 2026

बार्शी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा; शेतकऱ्यांना तातडीची मदत व कर्जमाफी द्या, शिवसेनेची मागणी

September 19, 2026

गौरी गणपती आरासमध्ये लावले पोलीसांच्या कार्याचे संदेश देणारे फलक

September 19, 2026
जिल्हास्तरीय वेटलिफ्टिग स्पर्धेत तीन खेळाडू प्रथम; पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड

जिल्हास्तरीय वेटलिफ्टिग स्पर्धेत तीन खेळाडू प्रथम; पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड

September 19, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1233401

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!