पंढरपूर – महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठल मंदिराच्या जतन आणि संवर्धन कामाच्या पहिल्या टप्प्यातील
शेवटचे तसेच अत्यंत
महत्त्वाचे काम सध्या सुरू झाले आहे. मंदिराच्या गाभाऱ्यातील काम पूर्ण झाल्यानंतर आता पश्चिम द्वाराच्या
संवर्धनाला गती देण्यात आली आहे. अनेक वर्षांपासून पश्चिम दरवाजावर असलेले सिमेंटचे गोपूर उतरवण्यात आले असून, त्याजागी आता सागवानी लाकडापासून बनवलेले पुरातन पद्धतीचे गोपूर उभारले जात आहे.
संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या काळातील मूळ विठ्ठल मंदिर भाविकांना अनुभवायला मिळावे, या उद्देशाने मंदिर समितीने हा निर्णय घेतला आहे. सिमेंटच्या आधुनिकीकरणामुळे हरवलेला ऐतिहासिक आभास पुन्हा निर्माण करण्यासाठी पश्चिम द्वाराचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. येत्या कार्तिकी वारीपर्यंत हे नवीन, पण पुरातन रूपातले गोपूर भाविकांसाठी खुले होणार आहे. पश्चिम द्वारानंतर नामदेव पायरीचे (महाद्वार) काम हाती घेतले जाणार आहे. एकूणच, विठ्ठल मंदिर आता सिमेंटच्या आवरणातून बाहेर पडून आपल्या मूळ ऐतिहासिक वैभवात परतत आहे.
——————-
कोट
पुरातन खात्याच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठल मंदिराचे संवर्धन सुरू आहे. भाविक विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेऊन पश्चिम दरवाजातूनच बाहेर पडतात. त्यामुळे या संपूर्ण द्वाराला आता पूर्णपणे सागवानी लाकडात पुरातन लूक दिला जात आहे. हे काम २० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. या गोपुराची उंची शिखरापेक्षा कमी असली तरी त्याचा पुरातन लूक भाविकांना आकर्षित करेल. यानंतर नामदेव पायरीचे काम हाती घेण्यात येईल.
प्रवीण कुमार घम (व्यवस्थापक,श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती)
Views: 9