सांगोला – सोलापूर जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी केली व समस्या जाणून घेतल्या. शुक्रवार दि.२ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी दुष्काळी पाहणीच्या अनुषंगाने सांगोला तालुक्यामध्ये भेट दिली. सदर भेटीमध्ये वाणीचींचाळे, वाकी घेरडी, बुरलेवाडी, राजापूर, वाढेगाव या सांगोला तालुक्यातील गावात शेती पीक नुकसानी बाबतची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी मंगळवेढा उपविभागीय अधिकारी बी.आर.माळी, सांगोला तहसीलदार बाळूताई भागवत, कृषी अधिकारी दिपाली जाधव, गटविकास अधिकारी योगेश कांबळे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.असलम सय्यद तसेच पाणीपुरवठा अधिकारी, कृषी मंडळ अधिकारी, मंडळ अधिकारी महसूल, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामसचिव व कृषी सहाय्यक उपस्थित होते.
Post Views: 5