Tuesday, August 18, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

हीच स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांची श्रीमंती- ह भ प जगन्नाथ महाराज देशमुख

तरुण भारतbyतरुण भारत
August 17, 2026
in west maharashtra
0
हीच स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांची श्रीमंती- ह भ प जगन्नाथ महाराज देशमुख
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
पंढरपूर – एखाद्या व्यक्तीने आपल्या कार्यातून समाजासाठी निर्माण केलेली संपत्ती, संस्कार आणि केलेली सेवा हीच त्यांची खरी श्रीमंती असते. अशा कर्तृत्ववान व्यक्तीच्या चरणी सेवा रुजू करण्याची संधी मिळणे आणि त्यांच्या कार्याचे स्मरण करणे ही आपल्यासाठी भाग्याची बाब असल्याचे भावोद्गार ह. भ. प. जगन्नाथ महाराज देशमुख यांनी स्व. सुधाकरपंत परिचारक यांच्या पुण्यस्मरण निमित्त काढले.
पंढरपूर तालुक्याचे भाग्यविधाते, पांडुरंग परिवाराचे नेते तथा माजी आमदार श्रद्धेय सुधाकरपंत परिचारक यांच्या सहाव्या पुण्यस्मरणानिमित्त श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या वाखरी येथील कर्मयोगी प्रशासकीय भवन येथे विविध धार्मिक, सामाजिक व सेवाभावी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. जगन्नाथ महाराज देशमुख यांचे भक्तिमय कीर्तन संपन्न झाले.
यावेळी कीर्तनातून जगन्नाथ महाराज यांनी श्रद्धेय सुधाकरपंत परिचारक यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या सामाजिक, सहकार, राजकीय तसेच धार्मिक क्षेत्रातील योगदानाचा आवर्जून उल्लेख केला.
कीर्तनादरम्यान ह.भ.प. जगनाथ महाराज देशमुख यांनी संतपरंपरा, भक्ती, नामस्मरण, सदाचार आणि समाजसेवेचे महत्त्व विशद करून उपस्थितांना मार्गदर्शन केले. संतांच्या विचारांचा समाजजीवनावर होणारा सकारात्मक परिणाम तसेच माणसाने समाजाप्रती आपली जबाबदारी कशी पार पाडावी, याबाबत त्यांनी विविध उदाहरणांतून मार्गदर्शन केले. अभंग, भजन आणि हरिनामाच्या जयघोषामुळे कारखाना परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.
यावेळी सामाजिक भान जपत कारखान्याच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात पांडुरंग परिवारातील पदाधिकारी, कार्यकर्ते व कारखान्याचे कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने सहभागी होवून रक्तदान केले.
यावेळी बोलताना माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी स्व.सुधाकरपंत परिचारक यांनी आयुष्यभर समाजातील सर्व घटकांसाठी प्रामाणिकपणे काम केले. सहकार, शिक्षण, सामाजिक कार्य आणि धार्मिक क्षेत्रात त्यांनी निर्माण केलेले योगदान आजही समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन केले.
स्व.परिचारक यांच्या स्मृतींना उजाळा देत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला पांडुरंग परिवारातील पदाधिकारी, कार्यकर्ते, सभासद, कर्मचारी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हरिनामाच्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.
——————–
चौकट : ( मान्यवरांची होती उपस्थिती )
या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे जलसंपदामंत्री गिरीष महाजन, आमदार समाधान आवताडे, आमदार बाबासाहेब देशमुख, आमदार अभिजित पाटील, आमदार उत्तमराव जानकर, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, मनोहरभाऊ डोंगरे, मा.आमदार दिलीपराव माने, मा.आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, मा.आमदार दत्तात्रय सावंत, मा.आमदार रामभाऊ सातपुते शिवाजीराव काळुंगे, शिवानंद पाटील, अनिल सावंत, कल्याणराव काळे, बाळराजे पाटील, राहुल शहा, तानाजी खरात, बी. पी. रोंगे, संजय आवताडे, गणेश पाटील, शशिकांत चव्हाण, विक्रम शिंदे तसेच जिल्ह्यातील विविध पक्षाचे पदाधिकारी पांडुरंग परिवारातील पदाधिकारी कार्यकर्ते आदी मान्यवरांनी श्रद्धेय सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले.
——————–
चौकट : ( दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन )
दरम्यान स्व.सुधाकरपंत परिचारक यांच्या पुण्यस्मरणानिमित्त पंढरपूर तालुक्यातील विविध गावांमध्ये सकाळपासून धार्मिक, सामाजिक आणि सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
Post Views: 3
Previous Post

नागपंचमीनिमित्त श्री रुक्मिणी मातेस पारंपरिक अलंकार परिधान

Next Post

कु. आश्लेषा नलगे हिची राज्य कर निरीक्षक पदी निवड

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
कु. आश्लेषा नलगे हिची राज्य कर निरीक्षक पदी निवड

कु. आश्लेषा नलगे हिची राज्य कर निरीक्षक पदी निवड

ताज्या बातम्या

साधू-संतांच्या सत्संगाचा कधी अस्तंच होत नाही -ह.भ.प. जयवंत बोधले महाराज

August 17, 2026
अरिहंत इंग्लिश स्कूलमध्ये 80 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

अरिहंत इंग्लिश स्कूलमध्ये 80 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 17, 2026
कै.वि.मो.मेहता प्राथमिक शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा 

कै.वि.मो.मेहता प्राथमिक शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा 

August 17, 2026
क्रांतिकारकांच्या बलिदानातून भारताला स्वातंत्र्य मिळाले

क्रांतिकारकांच्या बलिदानातून भारताला स्वातंत्र्य मिळाले

August 17, 2026
बार्शी तालुका पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; ३ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त, सात जणांवर कारवाई

बार्शी तालुका पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; ३ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त, सात जणांवर कारवाई

August 17, 2026
वारकरी मंडळाच्या वतीने आषाढी वारीच्या सेवेसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा सत्कार

वारकरी मंडळाच्या वतीने आषाढी वारीच्या सेवेसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा सत्कार

August 17, 2026

मनपाचे ९ भूखंड वाचवण्यासाठी महाविकास आघाडी एकवटली

August 17, 2026

स्वातंत्र्य दिनानिमित्त कवी संमेलन

August 17, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1078731

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!