पंढरपूर – विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील प्रत्येकाला माणूस म्हणून जगण्याची संधी संविधानातून दिली. आज बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाच्या अधिकारामुळेच मी पंढरपूर पंचायत समितीचा सभापती झालो हे बाबासाहेबांचे माझ्यावर आणि आपणा सर्वांवर थोर उपकार आहेत असे उद्गार पंढरपूर पंचायत समितीचे सभापती डॉक्टर शुभम आगवणे यांनी काढले.
विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती समितीच्या वतीने आयोजित रंगभरण स्पर्धेचे उद्घाटन सभापती डॉक्टर शुभम आगवणे यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी व्यापार व उद्योग सेलचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे होते.
या कार्यक्रमास आरपीआयचे ज्येष्ठ नेते सुनील सर्वगोड, जितेंद्र बनसोडे, आरपीआय तालुकाध्यक्ष संतोष पवार, शिंदे गटाच्या युवा सेनेचे शहराध्यक्ष संग्राम अभंगराव ,समितीचे अध्यक्ष अभिराज उबाळे, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र आठवले, समाधान लोखंडे, शैलेश आगावणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
रंगभरण स्पर्धेत शहरातील सर्व प्रशालेतील शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परवेज मुजावर, विशाल मांदळे, महेश मोटे, योगेश जाधव, कृष्णा सर्वगोड, सुरज साखरे, रुपेश वाघमारे ,स्वप्निल कांबळे, अजिंक्य होवाळ यांच्यासह भीम जयंती सार्वजनिक जयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.


















