पर्यावरण संवर्धन, हरित परिसर निर्मिती आणि सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत शाळेच्या परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.
यावेळी रोटरी क्लब ऑफ सोलापूर स्मार्ट सिटीचे अध्यक्ष रोटेरियन बसवराज आर. बिराजदार, सचिव रोटेरियन संतोषकुमार सावळगी, प्रकल्प प्रमुख रोटेरियन योगिनाथ कुडते, सहायक प्रांतपाल रोटेरियन महेश साळुंके, रोटेरियन गणेश लिंगशेट्टी, रोटेरियन दीपक भोगे तसेच रोटरॅक्ट क्लब ऑफ स्मार्ट ऑर्किड कॉलेजच्या अध्यक्षा समृद्धी गवळी, सचिव श्रावणी बिराजदार, त्यांचे पदाधिकारी व सदस्य, विद्यार्थी, शिक्षक आणि उळे गावातील जलसमृद्धी उद्योगाचे उद्योजक दत्ता डांगे व त्यांचे सहकारी, तसेच माजी नगरसेवक जगदीश अण्णा पाटील आणि त्यांचे चिरंजीव अमित पाटील व सुमित पाटील संख्येने उपस्थित होते. “वृक्ष लावा, पर्यावरण वाचवा आणि भावी पिढीसाठी हरित भविष्य घडवा” हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. “सर्व्हिस अबाव सेल्फ”
या रोटरीच्या सेवाभावी विचाराला अनुसरून हा उपक्रम यशस्वीपणे पूर्ण करण्यात आला.



















