सोलापूर : महाराष्ट्र दिन, कामगार दिन आणि सोलापूर महापालिका स्थापना दिनानिमित्ताने निमित्ताने सोलापूर महापालिकेचे इंद्रभुवन , प्रशासकीय इमारत आणि कौन्सिल हॉल विद्युतरोषणाई नटले आहे. राष्ट्रध्वजातील तिरंगी रंगात विद्युत रोषणाई केली आहे. आकर्षक मनोहारी अशा विद्युत रोषणाईने अवघा महापालिका परिसर उजळून गेला आहे.
सोलापूर महापालिकेची इंद्रभुवन इमारत, कौन्सिल हॉल, आणि प्रशासकीय इमारतीवर तिरंगी रंगात विद्युत रोषणाई केली आहे. तसेच प्रशासकीय इमारत व महापालिकेच्या परिसरामध्ये आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यामुळे अवघा परिसर नटलेला दिसून येतोय. सोलापूर महापालिकेच्या सर्व इमारतींवर एलईडी लाईट द्वारे आकर्षक अशी ही विद्युतरोषणाई सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या आदेशानुसार विद्युत विभाग कार्यकारी अभियंता राजेश परदेशी, अभियंता महादेव इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम करण्यात आले आहे.
या विद्युतरोषणाईमुळे इंद्रभुवन इमारतीचा फोटो घेण्यासाठी बुधवारी रात्री अनेकांना सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही. अवघा सोलापूर महापालिकेचा परिसर आकर्षक आणि सुंदर दिसत आहे.

























