कोंडी शिवारात समोरील पिकपला धडकून दुचाकी स्वार जागीच ठार
सोलापूर – भर धाव वेगातील दुचाकी समोरील पिकप ला पाठीमागून धडकल्याने झालेल्या अपघातात एका बँकेत असिस्टंट मॅनेजर असलेला दुचाकी स्वार गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाल्याची घटना सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी शिवारात सोमवारी रात्री साडेआठ वाजता घडली .
कौस्तुभ विनोद देशपांडे (वय 30 वर्ष , राहणार मोहोळ )असे त्या मयत दुचाकी स्वाराचे नाव आहे . ते मुरारजी पेठेतील एचडीएफसी बँकेत असिस्टंट मॅनेजर म्हणून कार्यरत होते. रोजच्या प्रमाणे तो सोमवारी रात्री ड्युटी संपवून आपल्या मोटारसायकलने मोहोळ कडे घराला निघाला होता. रात्री साडेआठ वाजता कोंडी शिवारात समोरील चार चाकी पिकप वाहनाला त्याची दुचाकी पाठीमागून धडकली . या धडकेत तो गंभीर जखमी होऊन बेशुद्ध होऊन पडला . दरम्यान त्याला एका रुग्णवाहिकेतून येथील शासकीय रुग्णालयात रात्री साडेनऊ वाजता दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले .मयत कौस्तुभ हा अविवाहित असून तो एकुलता एक होता अशी माहिती नातेवाईकांनी दिली. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच बँक कर्मचारी, नातेवाईक आणि मित्रांनी येथील शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी केली होती.

कामती – कुरुल मार्गावर पिकप च्या धडकेत दुचाकी स्वार जागीच ठार
सोलापूर – भर वेगातील पिकप वाहनाच्या धडकेत कामती येथील दुचाकी स्वार जागीच ठार झाल्याची घटना मोहोळ तालुक्यातील कामती कुरुल रस्त्यावर सोमवारी रात्री आठ वाजता घडली .
चेतन तानाजी पवार ( वय 24 वर्ष , रा . कामती ( बु) ,ता मोहोळ ) असे त्या मयत मोटरसायकल स्वाराचे नाव आहे . तो मंगळवारी रात्री मोटरसायकल वरून डबल सीट कामतीकडून कुरुल कडे निघाला असताना वाटेत तुळशीराम लॉन्स जवळ समोरून येणाऱ्या पिकप वाहनाने त्याला जोरात धडक मारली . या धडकेत तो गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडला असता त्याला उपचाराकरता येथील शासकीय रुग्णालयात मामा संजय पाटवे यांनी रात्री सव्वा दहा वाजता दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले .
Post Views: 5