सांगोला – पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून सांगोल्यात प्रथमच सांगोला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असुन महोत्सवात फॅबटेक उद्योग समूहाच्या पुढाकाराने अनेक नामवंत कंपन्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. यातून ३०० हून अधिक बेरोजगारांना मुलाखतीच्या माध्यमातून नोकऱ्या उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची महिती भाऊसाहेब रूपनर यांनी दिली.
बजाज ऑटो, टाटा मोटर्स, प्रिसिजन कॅमशाफ्ट, एलएचपी, भारत फोर्ज, पार्क रोबोटिक्स, महिंद्रा ओटो स्टिल, हार्मन-सॅमसंग अशा एकुण ३५ हून अधिक नामांकित कंपनीकडून शुक्रवार दि.२९ व ३० मे रोजी न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्यु.कॉलेज सांगोला येथे मुलाखती घेतल्या जाणार आहेत. १० वी, १२ वी, डिप्लोमा, कोणत्याही शाखेचा पदवीधर, इंजिनिअरिंग,आय टी आय आदी इच्छुक उमेदवारांनी आपले अद्ययावत बायोडाटा आणि शैक्षणिक कागदपत्रांसह या मेळाव्यात उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांकडून करण्यात आले आहे.
Post Views: 4