Thursday, June 4, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

वंदे मातरम हे प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देणारे गीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

तरुण भारतbyतरुण भारत
November 8, 2025
in solapur
0
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर – वंदे मातरम हे गीत भारतातील प्रत्येक नागरिकाला प्रेरणा देणारे गीत आहे. देश प्रेमाची धगधगती ऊर्जा 150 वर्षांनंतरही या गीतातून आजही मिळते. 1875 साली बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेले वंदे मातरम हे गीत स्वातंत्र्ययुद्धाचे राष्ट्रगान बनले व प्रत्येक भारतीयाच्या मनात राष्ट्रभक्तीचे स्फुल्लिंग चेतविले, असे प्रतिपादन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.

     दयानंद महाविद्यालयाच्या मैदानावर भारताचा 150 बाय 100 फुटांचा मानवी नकाशा साकारण्यात आला. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.

    यावेळी श्रीमती रोहिणी तडवळकर, छत्रपती शिवाजी महाराज शासकीय सर्वोपचार रुग्णालयाच्या डॉ. अग्रजा चिटणीस वरेरकर, आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन डांगरे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या राज्यपाल नियुक्त अधिसभा सदस्य ऍड. सुनंदा भगत, सामाजिक कार्यकर्त्या मनीषा चारी- वालेकर, दयानंद शिक्षण संस्थेचे प्रशासक प्रा. डॉ. व्ही. पी. उबाळे, डी. बी. एफ. दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य बी. एच. दामजी आदी उपस्थित होते.

     पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले,  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमातून वंदे मातरम या गीताच्या वैभवशाली वारशाची आठवण देशाला करून दिली. 2047 साली भारतीयांच्या स्वप्नातील विकसित भारताच्या जडणघडणीत वंदे मातरम हे गीत महत्त्वाचे ठरणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

    वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आई प्रतिष्ठान आणि दयानंद शिक्षण संस्थेतर्फे शुक्रवारी दोन हजार विद्यार्थिनींनी सामूहिक वंदे मातरम गायन केले. यावेळी दोन हजार विद्यार्थिनींनी दीड एकर जागेत भारताचा मानवी नकाशा साकारला.

      राष्ट्रभक्तीचे स्फुल्लिंग चेतविणाऱ्या या कार्यक्रमास पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी उपस्थित राहून ‘वंदे मातरम’ चे गायन करीत विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला. कलाकार विपुल मिरजकर यांनी दोरीच्या साह्याने भारताचा मानवी नकाशा साकारला.

    या उपक्रमात दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय, डी. ए. व्ही. वेलणकर वाणिज्य महाविद्यालय, डी. जी. बी. दयानंद विधी महाविद्यालय, डी.पी.बी.  दयानंद कॉलेज ऑफ एज्युकेशन, दयानंद काशिनाथ असावा प्रशाला, भू. म. पुल्ली कन्या प्रशाला, मार्कंडेय हायस्कूल, सिद्धेश्वर कनिष्ठ महाविद्यालयातील दोन हजार विद्यार्थिनी उत्साहात सहभागी झाल्या होत्या.

                                             

Post Views: 36
Previous Post

विश्वविजेत्या महिला क्रिकेट संघाचा विजय देशातील मुलींसाठी प्रेरणादायी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक समिती जाहीर, जिल्हा निवड समितीत अनेक दिग्गजांचा समावेश

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक समिती जाहीर, जिल्हा निवड समितीत अनेक दिग्गजांचा समावेश

ताज्या बातम्या

हक्काच्या ऊस बिलासाठी शेतकऱ्यांना व्हावे लागले अर्धनग्न

June 4, 2026

आंदोलनाची वेगळी स्टाईल थेट टाकले दंडवत

June 4, 2026

पेट्रोल डिझेल खर्चाचा फटका असाही #marathinews #news

June 4, 2026

मराठा आरक्षण मोठी अपडेट #viral #news #marathinews

June 4, 2026

पंकजा मुंढेचा सैराट अंदाज …… स्वतः चालवला ट्रॅक्टर #marathinews #news #viral

June 4, 2026

आता जागा झाला मणियार……. #marathinews #news

June 4, 2026

भारीच ….पाहिले आहे का असे स्वागत?? #viral #news #marathinews

June 4, 2026

महागात पडले वृक्षतोड हजारे पाटील यांना एक कोटी १८ लाखांचा दंड

June 4, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

byतरुण भारत
May 31, 2026
0

टेंभुर्णी - (ता.माढा) येथे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या पदाधिकारी मेळावा व नवीन पदाधिकारी निवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या...

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0893136

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697