Monday, July 27, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सोलापूरच्या इतिहासाची स्पंदने: वारसा संवर्धनाचा अध्याय! ”जागतिक वारसा सप्ताहा’चा समारोप

तरुण भारतbyतरुण भारत
November 24, 2025
in solapur
0
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – जागतिक वारसा सप्ताहाचे (World Heritage Week) औचित्य साधून भारतीय राष्ट्रीय कला व सांस्कृतिक वारसा न्यास (INTACH), इंट्याक सोलापूर शाखेच्या वतीने आयोजित केलेल्या ‘वारसा फेरी’चा दुसरा दिवस सोलापूरच्या आंतरराष्ट्रीय आणि प्रशासकीय इतिहासाचे तेजस्वी दर्शन घडवत अत्यंत यशस्वीरित्या संपन्न झाला. सोलापूरच्या इतिहासाचे ‘आंतरराष्ट्रीय स्वाभिमान’ म्हणून ओळखले जाणारे डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचे स्मारक आणि ब्रिटिशकालीन वारसा जपणाऱ्या महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ऐतिहासिक इमारतीस ही वारसा फेरी भेटली. हा द्विदिवसीय उपक्रम सोलापूरच्या वारसा संवर्धनाच्या चळवळीला नवी दिशा देणारा ठरला.

हिंदी-चीनी मैत्रीचे अजरामर प्रतीक: डॉ. द्वारकानाथ कोटणीस स्मारक : दुसऱ्या दिवसाची सुरुवात सोलापूरचे थोर मानवतावादी पुत्र आणि आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्व डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या स्मृती स्मारकाच्या भेटीने झाली. ही वास्तू हिंदी-चीनी मैत्रीचे एक अजरामर प्रतीक म्हणून सोलापूरकरांसाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. फेरीच्या प्रारंभी, डॉ. सीमंतिनी चाफळकर आणि सहसमन्वयक आर्कि. श्वेता कोठावळे यांनी डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचे जीवन चरित्र थोडक्यात पण अत्यंत प्रभावीपणे उलगडले. त्यांचे बालपण, सोलापूरमधील त्यांचे निवासस्थान, त्यांचे पालक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील त्यांचे अतुलनीय कार्य याबद्दलच्या अनुषंगिक गोष्टींनी उपस्थितांना भावनाविवश केले. चिनी जनतेने त्यांना ‘इंद्रधनुष्याखालील देवदूत’ म्हणून वंदिले. त्यांचे निस्वार्थ कार्य हिंदी-चीनी मैत्रीचा आधारस्तंभ ठरले असून, चीनमध्ये त्यांच्या नावाचा पुतळा आणि शाळा स्थापन आहेत. त्यांचे कार्य त्याग, सेवा आणि आंतरराष्ट्रीय बंधुत्वाचे एक देदीप्यमान उदाहरण आहे.

 स्मृती संग्रहालयातील अनमोल ठेवा : डॉ. कोटणीस यांचे हे निवासस्थान आता सोलापूर महानगरपालिकेच्या पुढाकाराने व सहकार्याने सुस्थितीत असून संग्रहालयात रूपांतरित झाले आहे. ब्रिटीश वसाहतकालीन बंगल्याच्या स्थापत्यशास्त्राचा नमुना असलेल्या या वास्तूत डॉ. कोटणीस यांच्या जीवनातील अमूल्य गोष्टी जतन करण्यात आल्या आहेत.  या स्मारकात डॉ. कोटणीस यांच्या हस्ताक्षरातील पत्रे, डायऱ्या, दुर्मीळ छायाचित्रे आणि त्यांच्या रोजच्या वापरातील वस्तूंचा समावेश आहे. याशिवाय, चीनमधील त्यांच्या वैद्यकीय कार्याशी संबंधित दुर्मिळ कागदपत्रे आणि वस्तू येथे पाहायला मिळतात. हा छायाचित्र संग्रह त्यांच्या चीनमधील संघर्षाचा आणि तेथील लोकांशी असलेल्या भावनिक नात्याचा सखोल परिचय करून देतो.

या संग्रहालयाचे जतन हा आंतरराष्ट्रीय ऐतिहासिक वारसा असून तो सोलापूरचा स्वाभिमान आहे म्हणून हा आंतरराष्ट्रीय ऐतिहासिक वारसा इथून पुढे सर्व सोलापूरकरवासियांना व इतिहासप्रेमींना सहज भेट देण्यासाठी कायमस्वरूपी खुला असावा, अशी तीव्र आशा उपस्थित नागरिक आणि इतिहासप्रेमींनी व्यक्त केली.

वारसा संवर्धनाचे सरकारी आदर्श: राज्य उत्पादन शुल्क विभाग : डॉ. कोटणीस यांच्या स्मारकानंतर, वारसा फेरीचा पुढील टप्पा महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सोलापूर विभागाच्या ऐतिहासिक इमारत कार्यालयाच्या भेटीचा होता. ही ब्रिटिशकालीन वास्तू सुमारे शतकापूर्वीची असून वारसा जतन आणि संवर्धनाचे एक आदर्श असे सरकारी उदाहरण या निमित्ताने नागरिकांसमोर आले.

अधीक्षक जाधव मॅडम यांचा सृजनशील पुढाकार : या कार्यालयाचे आणि परिसराचे पुनरुत्थान आणि रूप पालट होण्यामागे अधीक्षक अधिकारी भाग्यश्री जाधव मॅडम यांचे वैयक्तिक लक्ष आणि सृजनशील पुढाकार कारणीभूत ठरला आहे. त्यांनी अत्यंत बारकाईने अभ्यास करून आणि जुन्या दगडी बांधकामाला धक्का न लावता, वारसा इमारतीच्या संवर्धनाचे उत्कृष्ट कार्य केले आहे.

अधीक्षक जाधव मॅडम यांनी इमारतीची आणि परिसराची डागडूची करून जीर्ण झालेल्या दगडी इमारतीला पुन्हा भव्य रूप प्राप्त करून दिले. त्यांनी निवासस्थानामध्येदेखील स्वच्छता आणि सुधारणा करून हा परिसर देखणा बनवला आहे. या कार्यामुळे ही इमारत आणि तिचा परिसर त्यांच्या कष्ट व सृजनशीलतेचे प्रतीक ठरले आहे. सरकारी अधिकारी असूनही वारसा जतन व संवर्धनाचे हे उत्कृष्ट उदाहरण त्यांनी नागरिकांपुढे प्रस्तुत केले.

वास्तुकला आणि इतिहास : या इमारतीची वास्तुकला, वास्तुचना, दगडी बांधकाम ब्रिटिशकालीन प्रशासकीय वास्तूशैलीचे उत्कृष्ट दर्शन घडवते. या वारसा फेरीच्या निमित्ताने उपस्थित असलेल्यांना या इमारतीचा इतिहास आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्याचा इतिहास याबद्दल माहिती देण्यात आली. वास्तूच्या मूळ रचनेत कोणताही बदल न करता, अनुषंगिक सुधारणा व स्वच्छता केल्यामुळे, वास्तूच्या ऐतिहासिक मूल्यात भर पडली आहे.

उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात वारसा फेरीचा समारोप करताना, इंट्याक सोलापूरचे समन्वयक प्रा. डॉ. नरेंद्र काटीकर यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे, विशेषतः अधीक्षक भाग्यश्री जाधव मॅडम यांचे, त्यांच्या वारसा संवर्धनाच्या अतुलनीय कार्याबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त केले. या दोन दिवसांच्या ‘वारसा फेरी’ने सोलापूरच्या सांस्कृतिक पदचिन्हांचे केवळ पुनरुत्थान केले नाही, तर येथील नागरिकांना आपल्या वैभवशाली भूतकाळाशी जोडले आणि वारसा संवर्धनासाठी नवी प्रेरणा दिली. पुढे, हा वारसा चालू ठेवण्यासाठी आणि सोलापूरच्या या सुप्त इतिहासाचा जागर करण्यासाठी, वारसा संबंधित छायाचित्र व माहिती प्रदर्शनी आयोजित करावी, असे मत त्यांनी व्यक्त केले. 

याप्रसंगी बँक ऑफ इंडियाचे सोलापूरचे ट्रेनिंग सेंटर आरसेटी यांचे संचालक श्री. दीपक वाडेवाले, वरिष्ठ प्रशिक्षक शिवानंद तडवळकर, कौशल्य प्रशिक्षक सौ. सुलोचना टेकाळे, सौ. तृप्ती पतंगे यासह मोठ्या विद्यार्थी संख्येने उपस्थित होते. तसेच सोमनपा उद्यान विभाग प्रमुख स्वप्निल सोलनकर, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी अधीक्षक श्रीमती भाग्यश्री जाधव, श्री अनिकेत जाधव, श्री जगन्नाथ पाटील प्र.उप अधीक्षक, श्री अविनाश घाटगे निरीक्षक, श्री विकास पवार कार्यालय अधीक्षक, श्री धनाजी पोवार दुय्यम निरीक्षक, श्री मुकेश चव्हाण सहा. दुय्यम निरीक्षक,श्री रशीद शेख, श्री योगेश गाडेकर यांचे देखील मोलाचे सहकार्य लाभले. याप्रसंगी श्रीकांत अंजूटगीकर, डॉ अंकुश राव, प्रा. बी. आर. पाटील, डॉ. संध्या रघोजी, शांता येळंबकर, कृष्णा मोरे, अतुल देशपांडे यांसह मोठ्या प्रमाणावर साधारणता दोनशेहून अधिक इतिहास प्रेमी नागरिक या वारसा फेरीसाठी उपस्थित होते. इंट्याक सोलापूर शाखेच्या वतीने आयोजित या दोन दिवसांच्या ‘वारसा फेरी’ने सोलापूरच्या सांस्कृतिक, आध्यात्मिक, आंतरराष्ट्रीय आणि प्रशासकीय पदचिन्हांचे यशस्वी दर्शन घडवले आणि सोलापूरच्या वारसा संवर्धनाच्या चळवळीला नवी ऊर्मी प्रदान केली.

Post Views: 157
Previous Post

मनसे शिक्षक सेनेचा पहिली पासून हिंदी सक्तीला विरोध

Next Post

महाविकास आघाडी इलेक्टीव्ह मोडवर ; स्टॅन्डिंगसह इच्छुक उमेदवारांची चाचपणी झाली सुरू

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

महाविकास आघाडी इलेक्टीव्ह मोडवर ; स्टॅन्डिंगसह इच्छुक उमेदवारांची चाचपणी झाली सुरू

ताज्या बातम्या

भारतरत्न इंदिरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात बायोमेडिकल अभियांत्रिकी पदवीचा अभ्यासक्रम उपलब्ध: अध्यक्ष  रवींद्र डी.  गायकवाड 

भारतरत्न इंदिरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात बायोमेडिकल अभियांत्रिकी पदवीचा अभ्यासक्रम उपलब्ध: अध्यक्ष  रवींद्र डी.  गायकवाड 

July 26, 2026
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंत्रोळी येथे भव्य दिव्य दिंडी सोहळा उत्साहात 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंत्रोळी येथे भव्य दिव्य दिंडी सोहळा उत्साहात 

July 26, 2026
शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर शारीरिक शिक्षण शिक्षकांचे बेमुदत आमरण उपोषण सुरू

शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर शारीरिक शिक्षण शिक्षकांचे बेमुदत आमरण उपोषण सुरू

July 26, 2026
जेन झी’च्या माध्यमातून हरवलेला जनाधार मिळवण्याचा ठाकरे बंधूंचा प्रयत्न-हेमंत पाटील

जेन झी’च्या माध्यमातून हरवलेला जनाधार मिळवण्याचा ठाकरे बंधूंचा प्रयत्न-हेमंत पाटील

July 26, 2026
ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. मिलिंद थोबडे यांचा ॲड. उज्ज्वल निकम यांच्याहस्ते सत्कार

ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. मिलिंद थोबडे यांचा ॲड. उज्ज्वल निकम यांच्याहस्ते सत्कार

July 26, 2026
अभिनव सामाजिक संस्थेने काढली महापुरुषांच्या विचारांची दिंडी

अभिनव सामाजिक संस्थेने काढली महापुरुषांच्या विचारांची दिंडी

July 26, 2026

पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरतीचे निकष स्पष्ट; इंग्रजी माध्यमातील उमेदवारांना मोठा दिलासा

July 26, 2026

आषाढी वारीत वारकऱ्यांच्या सेवेसाठी १५० कोटी

July 26, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1003458

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!