अकलूज – महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अनेक नेते कार्यकर्त्यांनी त्यांना हजारो वह्या व हजारो विविध झाडांची रोपे देऊन शुभेच्छा दिल्या.
शिवरत्न बंगला येथे सकाळपासूनच राज्यातून आलेल्या कार्यकर्त्यांची मोठी रेलचेल सुरू होती.सकाळी विजयसिंह मोहिते पाटील यांना कुटुंबातील महिलांनी औक्षण केले. त्यानंतर त्यांनी सकाळी शिवरत्न बंगल्यावर असणाऱ्या सहकार महर्षींच्या समाधीचे दर्शन घेतले व अकलूजचे ग्रामदैवत श्री अकलाई देवी यांचेही दर्शन घेऊन कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी ते उपस्थित झाले.
महाराष्ट्राच्या राजकारणातील आजी-माजी मंत्री, आजी-माजी खासदार, आमदार, विविध पक्षाचे प्रमुख, विविध क्षेत्रातील मान्यवर आदींनी विजयसिंह मोहिते पाटील यांना भ्रमणध्वनीवरून शुभेच्छा दिल्या. तर राज्यासह सोलापूर जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी व कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष भेटून त्यांना शुभेच्छा दिल्या. मोहिते पाटील परिवारातील सर्व सदस्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व संचालक मंडळ शिवामृत दूध उत्पादक सहकारी संघाचे चेअरमन खासदार धैर्यशील मोहिते पाटील व सर्व संचालक मंडळ सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक मंडळ व कर्मचारी वर्ग श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक मंडळ तसेच शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज नगर परिषद शिवरत्न शिक्षण संस्था, श्री विजय गणेशोत्सव मंडळ ट्रस्टचे ट्रस्टी चंद्रकांत कुंभार, श्रीकांत राऊत नितीन खराडे, भीमराव काळे ग्रीन फिंगर स्कूलचे सर्व संचालक व शिक्षक वर्ग माळशिरस तालुका ज्येष्ठ नागरिक संघटना त्याचबरोबर दादांसोबत काम केलेले नांदेड, बीड, मुंबई, पुणे येथील सार्वजनिक बांधकाम खात्यातील अधिकारी यांनीही उपस्थित राहून दादांना शुभेच्छा दिल्या
ग्रीन फिंगर्स आयुर्वेदिक हॉस्पिटल यांच्या वतीने विजयसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये १२१ रक्तदात्यांनी रक्तदान केले तर मोफत आरोग्य तपासणी शिबिरात एक्स-रे, सोनोग्राफी, पंचकर्म व सर्व सामान्य तपासण्या यामध्ये एकूण १८० रुग्णांनी सहभाग घेतला.
Post Views: 7