Friday, June 12, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

करमाळ्यात विकासकामांना ब्रेक; उपअभियंता पद रिक्तच

तरुण भारतbyतरुण भारत
June 12, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर – करमाळा पंचायत समितीच्या बांधकाम विभागातील उपअभियंता पद रिक्त राहिल्यामुळे विकासकामांच्या अंमलबजावणीवर परिणाम होत असल्याचे चित्र समोर आले आहे. संबंधित अधिकारी सेवानिवृत्त होणार असल्याची माहिती आधीपासून असतानाही पर्यायी नियुक्ती वेळेत करण्यात न आल्याने अनेक प्रशासकीय प्रस्ताव आणि विकासकामे रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
             प्राप्त माहितीनुसार, विद्यमान बांधकाम उपअभियंता यांच्या सेवानिवृत्तीपूर्वीच नवीन अधिकाऱ्याची नियुक्ती व्हावी यासाठी जिल्हा परिषद बांधकाम विभागाने दहा दिवस आधी प्रस्ताव प्रशासनाकडे पाठविला होता. मात्र, सेवानिवृत्तीला तब्बल अकरा दिवस उलटूनही नव्या उपअभियंत्याची नियुक्ती झालेली नाही.
              या रिक्त पदाचा परिणाम पंचायत समितीच्या विविध विकासकामांवर होत असल्याची चर्चा आहे. तांत्रिक मंजुरी, अंदाजपत्रके, मोजमापे तसेच विविध बांधकाम प्रस्तावांच्या प्रक्रियेला विलंब होत असल्याने ग्रामपंचायतींसह ठेकेदार आणि लाभार्थ्यांनाही प्रतीक्षा करावी लागत आहे.
                  विशेष म्हणजे जिल्हा परिषदेच्या पक्षनेत्या रश्मी बागल यांनी या पदावर तातडीने नियुक्ती करण्याबाबत प्रशासनाला लेखी पत्र दिले होते. मात्र, त्यानंतरही कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. लोकप्रतिनिधींच्या सूचनेकडे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे.
            दरम्यान, पंचायत समिती प्रशासन आणि गटविकास अधिकाऱ्यांनीही या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. विकासकामांची गती कायम ठेवण्यासाठी रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक असताना करमाळा पंचायत समितीतील हे महत्त्वाचे पद रिक्त राहिल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
           तालुक्यातील प्रलंबित कामे आणि रखडलेले प्रस्ताव यांचा विचार करता, नवीन उपअभियंत्याची नियुक्ती कधी होणार याकडे लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायती आणि ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
कोट
तो आमचा निर्णय
मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांना याबाबत विचारले असता या प्रकरणात काय निर्णय घ्यायचा तो घेतला जाईल. हा प्रशासनिक प्रश्न आहे. असे सांगून मुद्दा मिटविला.
Post Views: 10
Previous Post

झेडपी कर्मचार्‍यांसाठी एसबीआय ‘सॅलरी पॅकेज’ सामंजस्य करार 

Next Post

विजयसिंह मोहिते पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
विजयसिंह मोहिते पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

विजयसिंह मोहिते पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

ताज्या बातम्या

शेअर बाजारातील १ कोटी ८१ लाखांच्या नुकसानीतून उद्ध्वस्त झाला हसता-खेळता संसार!

June 12, 2026

शिव्या दिल्याचा जाब विचारल्याने तरुणास लोखंडी रॉड व लाथा बुक्याने मारहाण

June 12, 2026

शेतातील कचऱ्यापासून तयार नवीकरणीय डिझेलचा वाहनात यशस्वी प्रयोग

June 12, 2026

बुरलेवाडी येथील मजुराच्या मुलाची जागतिक कुस्ती स्पर्धेत सुवर्ण झेप

June 12, 2026

अफकॉन्सच्या सीएसआर उपक्रमामुळे 94 कर्करोगग्रस्त बालक व पालकांच्या जीवनात नवी उमेद

June 12, 2026

रोजगार, बेरोजगारी व असंघटित क्षेत्राची माहिती संकलित होणार

June 12, 2026

अवैध वाळू उत्खननाविरोधात प्रशासन आक्रमक; जिल्हाधिकारी आशिमा मित्तल व एसपी संधू यांची अचानक पाहणी

June 12, 2026

सरसकट कर्जमाफीसाठी आमदार रोहित पवारांचे अन्नत्याग आंदोलनास सुरुवात

June 12, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

byतरुण भारत
June 12, 2026
0

सांगोला -    राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व आहे. त्यांचा विजय उमेदवारी जाहीर झाल्याच दिवशी निश्चित झाला असून आता केवळ...

सोलापुरात राजकीय ‘गेमचेंजर’ बैठक ; पवार गटाचे तीन आमदार महायुतीच्या दालनात !

byतरुण भारत
June 11, 2026
0

सोलापूर - विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर सोलापूरच्या राजकारणात अनपेक्षित घडामोडींना वेग आला असून, बालाजी सरोवर येथे झालेल्या एका बैठकीने नव्या राजकीय...

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

byतरुण भारत
June 10, 2026
0

सांगोला -  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि रोजगाराभिमुख शिक्षण देत फॅबटेक टेक्निकल कॅम्पसने सांगोल्याला राज्याच्या शैक्षणिक नकाशावर ठळक स्थान मिळवून...

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

byतरुण भारत
June 9, 2026
0

सोलापूर : भाजप- महायुतीचे विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी सोमवारी महापौर विनायक कोंड्याल यांची महापौर निवासस्थानी सदिच्छा भेट...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0906154

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697