विकास सहकारी बँक लिमिटेड सोलापूर या संस्थेची 46 वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दिनांक 17 जुलै 2026 रोजी महेश भवन,सम्राट चौक सोलापूर येथे संपन्न झाली.

सदर सभेत बॅंकेचे अध्यक्ष श्री राजगोपाल चंडक यांनी बॅंकेच्या प्रगतीचा आढावा सभासदांसमोर सादर केला. चालू वर्षी बँकेस रुपये 5 कोटी 99 लाख इतका ढोबळ नफा झाला आहे . तसेच महत्वाचे म्हणजे बॅंकेचे नेट एनपीए चे प्रमाण मागील सहा वर्षापासून सतत “शून्य टक्के” आहे. बँकेने 577.26 कोटी चा व्यवसाय उद्दिष्ट पार केले असून CRAR 25.30% आहे. तसेच अग्रक्रम व दुर्बल घटक क्षेत्रास द्यायच्या कर्जाचे उद्दिष्टपण पूर्ण केले आहे.
तसेच संचालक CA श्री राजगोपाल मिणियार यांनी ताळेबंद पत्रक व नफा तोटा पत्रकांचे विश्लेषण सादर केले.
यावेळी सभासदांना 12 % लाभांशाची घोषणा करण्यात आली.
सभेत आभार प्रदर्शन श्री राजेंद्र कुमार आसावा यांनी केले. सदर सभा अंत्यत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
सदर सभेस संचालक हरीनिवास जाजू,राजकुमार राठी, कमलकिशोर राठी , ओमप्रकाश तिवाडी,नवनीत तोष्णीवाल,मनीष बलदवा, नंदकिशोर मुंदडा,चंद्रशेखर स्वामी,सुरेश बिटला, अनुराधा चांडक, ज्योती आसावा तसेच बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे सुनील माहेश्वरी,प्रवीण बजाज व इतर सभासद उपस्थित होते.



















