सोलापूर – शालेय शहर सॉफ्ट टेनिस स्पर्धेत रिषभ गोचडे, जान्हवी चाबुकस्वार, विपश्यना सोनवणे, आर्यन येमुल, यशवंतराजे पवार आणि मृण्मयी गायकवाड यांनी आपापल्या गटातील अंतिम सामन्यात प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून सुवर्णपदक पटकावले.
हरीभाई देवकरण लॉन टेनिस क्लब येथे ही स्पर्धा उत्साहात पार पडली. स्पर्धेचे उद्घाटन महानगरपालिका क्रीडा अधिकारी नजीर शेख यांच्या हस्ते झाले. यावेळी संतोष खेंडे, प्रमोद चुंगे, मारुती घोडके, रवी चव्हाण आणि प्रकाश कंपली उपस्थित होते. या स्पर्धेत सोलापूर शहरातील १४० खेळाडूंनी सहभाग नोंदविला. स्पर्धेचे मार्गदर्शन सॉफ्ट टेनिसचे सहसचिव शिवाजी वसपटे यांनी केले. स्पर्धेचे नियोजन सुधीर सालगुडे आणि महेश झांबरे यांनी केले.
स्पर्धेसाठी पंच म्हणून पूजा सालगुडे, बालाजी केदार, चंद्रकांत वाघमोडे, प्रशांत केदार, गणेश बंडगर आणि ओंकार जाधव यांनी काम पाहिले. यशस्वी खेळाडूंचे सॉफ्ट टेनिस संघटनेचे अध्यक्ष सिद्धेश्वर पाटील, सचिव संतोष गवळी, राज्य लॉन टेनिसचे मानद सचिव राजीव देसाई, तसेच प्रसाद सोनवणे आणि अक्षय गवळी यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
गुणानुक्रमे प्रथम सहा खेळाडू :
१७ वर्षांखालील मुले: रिषभ गोचडे ( नागेश करजगी ऑर्किड स्कूल), अजिंक्य शिवाजी वसपटे (श्रीमती निर्मलताई ठोकळ प्रशाला), रुद्रप्रताप चव्हाण ( लिटल फ्लॉवर कॉन्व्हेंट स्कूल), शंभुराजे पवार ( हरीभाई देवकरण प्रशाला), नमन साखरे ( इंडियन मॉडेल स्कूल), अनिकेत राजेश पडनुर ( के.एल.ई. इंग्लिश मीडियम स्कूल). मुली: जान्हवी चाबुकस्वार ( स्वामी विवेकानंद पोलीस पब्लिक स्कूल), देवयानी पाटील(सेंट जोसेफ हायस्कूल), राशी पवार (छत्रपती शिवाजी प्रशाला), तनिष्का पाटील (सेंट थॉमस स्कूल).
१९ वर्षांखालील मुले: आर्यन येमुल, आरुष गोचडे (दोघे हिराचंद नेमचंद कॉलेज), मयूर वसपटे ( हरीभाई देवकरण प्रशाला), शिवा हडपद (नेताजी सुभाषचंद्र बोस प्रशाला), संतोष गादास (छत्रपती शिवाजी प्रशाला), रिषभ भूतडा (हिराचंद नेमचंद कॉलेज). मुली: विपश्यना सोनवणे (व्ही. जी. शिवदारे ज्युनिअर कॉलेज), केतकी चौगुले, भक्ती जाधव ( दोघी संगमेश्वर कॉलेज), पलक कोल्हापूरे (श्रीमती निर्मलताई ठोकळ प्रशाला), दर्शनी चाकोते (संगमेश्वर कॉलेज)
१४ वर्षांखालील मुले: यशवंतराजे पवार (हरीभाई देवकरण प्रशाला), आर्थ पवार ( मेहता स्कूल), रिषिकेश चव्हाण (लिटल फ्लॉवर कॉन्व्हेंट स्कूल), विश्वजीत वसपटे (श्रीमती निर्मलताई ठोकळ प्रशाला), तनुज संचेती (के.एल.ई. इंग्लिश मीडियम स्कूल), श्रेयांश सिकरोरिया( सेंट थॉमस इंग्लिश मीडियम स्कूल). मुली: मृण्मयी गायकवाड ( नागेश करजगी ऑर्किड स्कूल),साईशा पुलमम (इंडियन मॉडर्न इंटरनॅशनल स्कूल), आरोही इचगी, आराध्या जाधव ( राज मेमोरियल स्कूल), शयनाया हिरेमठ (इंडियन मॉडेल स्कूल), अंजली गायकवाड (श्रीमती सरस्वती मराठी शाळा).
——




















