सांगोला – सूर्योदय फाउंडेशन, सांगोला यांच्यावतीने शिक्षक गौरव पुरस्कार कै.वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालयाचे मुख्याध्यापक विठ्ठलपंत वामनराव शिंदे यांना प्रा.नितीन बानगुडे-पाटील, अनिल इंगवले, डॉ.बंडोपंत लवटे, जगन्नाथ भगत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. विठ्ठलपंत शिंदे यांनी कर्तव्याच्या पलीकडे जाऊन सामाजिक बांधिलकी जपत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन सूर्योदय फाउंडेशनने त्यांना या पुरस्काराने सन्मानित केले. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, आजी-माजी विद्यार्थी आणि शिक्षणप्रेमी यांनी अभिनंदन केले.
Post Views: 9