सोलापूर – थांबलेल्या कंटेनरला धडकून जखमी झालेल्या टेम्पो मधील आणखी एका प्रवाशाचा उपचारादरम्यान येथील शासकीय रुग्णालयात आज रविवारी सकाळी सात वाजता मृत्यू झाला.
मंजुनाथ अरपणाळी (वय 45 वर्ष, रा. अरपणाळी, कर्नाटक राज्य) असे त्या मयत प्रवाशाचे नाव आहे.
मयत मंजुनाथ हे इतर प्रवाशांसोबत शनिवारी पहाटे पुणे येथून एका टेम्पो ट्रॅव्हल गाडीमध्ये बसून विजापूरकडे निघाले होते. पहाटे साडेपाच वाजता सदर टेम्पो मोहोळ तालुक्यातील चंद्रमौळी औद्योगिक वसाहत जवळ थांबलेल्या एका कंटेनर गाडीला पाठीमागून धडकला. या अपघातात 12 प्रवासी मार लागून जखमी झाले होते . त्या सर्वांना उपचाराकरिता येथील शासकीय रुग्णालयात सकाळी दाखल करण्यात आले असता बिरप्पा शंकरप्पा बिसराळी (वय 42 वर्षे, रा. तिघेरी, कोप्पाळा, कर्नाटक) यांचा शनिवारी सकाळी साडेदहा वाजता उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता आणि आज रविवारी सकाळी जखमी मंजुनाथ अरपणाळी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
जखमी प्रवाशांची नावे –
परशुराम मल्लप्पा बिसराळी(वय 35 वर्ष), अन्नमना गौडा (वय 35), अनमेश शरणाप्पा हंचनाळ(वय 30), गीदप्पा सेकदेप्पा अक्षिमणी(वय 35), शिवप्पा श्रीशैलआप्पा येणगी (वय 35) , बसवराज तळवार (वय 35) , ऊडचप्पा बागेवाडी (वय 35), परिरेश मल्लप्पा कलवाकळी(वय 30), कुडचप्पा यल्लाप्पा करडी वय 35 आणि मारुती मडेवालकर (वय 35 वर्ष, सर्व राहणार तिघेरी, कोप्पाळा, कर्नाटक) अशी जखमींची नावे आहेत.
Post Views: 5