“71व्या आचार्य शांतिसागर खुली राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा रविवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी श्राविका प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, सम्राट चौक, सोलापूरयेथे सकाळी 9:00 ते दुपारी 2.00 या वेळेत पार पडली. अत्यंत प्रतिष्ठित व नावलौकिक असलेल्या आचार्य शांतिसागर यांच्या,71व्या ‘पुण्यतिथीनिमित्त’ आयोजित खुल्या ‘वक्तृत्व ‘स्पर्धेत वालचंद कॉलेजऑफआर्ट्स अँड सायन्स कनिष्ठ महाविद्यालयातील शर्वरी ब्रह्मदेव लोखंडे (11वी विज्ञान) हिने, ‘प्रथम’ क्रमांकाचे 500/- रुपये रोख पारितोषिक, स्मृतिचिन्ह व गौरव प्रमाणपत्र, ‘द्वितीय’ क्रमांक याच महाविद्यालयातील 11 वी’ ‘विज्ञान’ शाखेतील गौरी आनंद करंडे हिने, (300/- रुपये रोख, स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र )तर, ‘तृतीय’ क्रमांक 11वी ‘कला’ शाखेतील सृष्टी चंद्रकांत सगरे (200/- रुपये रोख, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र ) असे गुणानुक्रमे प्रथम ‘तीन’ पुरस्कार प्राप्त करत ‘हॅट्रिक ‘ करत महाविद्यालयाच्या शिरपेचात स्पृहणीय यशाचा मानाचा तुरा खोवला. सदर वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाल्यानंतर लगेचच मान्यवरांच्या शुभहस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. ‘पेपरफुटीचे राजकारण आणि विद्यार्थ्यांचे मरण,’ अहिंसेशिवाय मानवता व्यर्थ ”- “राष्ट्रभाषा की राज्यभाषा -“या विषयावर स्पर्धकांनी आपले ‘वक्तृत्व ‘सादर केले.
यशस्वी स्पर्धक विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष कोटी, उपप्राचार्य अनुप म्हेत्रे, पर्यवेक्षक डॉ. जीवराज कस्तुरे यांनी हार्दिक अभिनंदन केले. यशस्वी विद्यार्थ्यांना चेतन तुपकर, चंद्रशेखर कस्तुरे यांनी मार्गदर्शन केले.
Post Views: 3