Tuesday, April 21, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

महिलांची जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धा आज पासून सोलापुरात

तरुण भारतbyतरुण भारत
December 21, 2025
in sports
0
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशन व सोलापूर जिल्हा लॉन टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ओॲसिस, प्रिसीजन, इलिझियम-जामश्री व बालाजी अमाईन्स पुरस्कृत महिलांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेचे आयोजन २१ ते २८ डिसेंबर २०२५ या कालावधीत एम. एस. एल. टी. ए. टेनिस सेंटर, जिल्हा क्रीडा संकुल, कुमठा नाका, सोलापूर येथे आयोजित केलेले आहे.

स्पर्धेची एकुण बक्षिस रक्कम ३०,०००/- अमेरिकन डॉलर असून स्पर्धेतील खेळाडूंना जागतिक मानांकन गुण देखील प्राप्त होणार आहेत. अशा प्रकारची अंतरराष्ट्रीय स्पर्धा सोलापूरात दहाव्यांदा भरविण्यात येत आहे. ही बाब सोलापूरसाठी अत्यंत अभिमानाची व प्रतिष्ठेची आहे. या स्पर्धेसाठी भारतासह १३ देशातुन एकूण ५६ महिला सहभागी होणार असुन यामध्ये २५ महिला खेळाडू या परदेशी आहेत. 

सोलापूर व लगतच्या जिल्हयामध्ये लॉन टेनिस खेळाचा प्रसार व प्रचार व्हावा व सोलापूरचे नांव जागतिक पातळीवर व्हावे या उद्देशाने या स्पर्धा आयोजित केल्याचे जिल्हा संघटनेचे अध्यक्ष राजेश दमाणी यांनी सांगितले.

या स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय टेनीस फेडरेशनने पुण्याच्या शितल अय्यर व नितिन कन्नमवर यांची सामना पर्यवेक्षक तर राज्य संघटनेचे संयुक्त सचिव राजीव देसाई यांची सामना संचालक म्हणून नियुक्ती केलेली आहे. 

या स्पर्धेसाठी पंच म्हणून अखिल भारतीय लॉन टेनिस संघटनेने श्रीराम गोखले (पुणे), श्रध्दा दलि (मुंबई), अमित देशपांडे (पुणे), पोन्नुसामी (चेन्नई), अतनु चक्रवर्ती (कलकत्ता), रिया चाफेकर (पुणे) यांची नियुक्ती केलेली आहे.

या स्पर्धेसाठी फिजीओथेरपीस्ट निकिता चव्हाण (पुणे), आनंदी दवे (गुजरात), इव्हेंट मॅनेजर संध्याराणी बंडगर, दळणवळण समन्वयक पुजा संचेती, भोजन व्यवस्था सुनंदा पवार व संतोष पवार पाहणार आहेत. तर व्हेन्यु इंनचार्ज म्हणून सुधीर सालगुडे व पुजा सालगुडे काम पाहणार आहेत. 

या स्पर्धेसाठी पुण्याच्या पुजा इंगळे व सोलापूरच्या पार्थसारथी मुंढे यांना मुख्य फेरीत तर सोलापूरच्या आकृती सोनकुसरे, युरोपस्थित (आईसलँड) कर्हाडच्या गरिमा काळुगडे व मुंबईच्या डॅनिका फर्नांडो यांना पात्रता फेरीत थेट प्रवेश देण्यात आला असल्याचे सोलापूर जिल्हा लॉन टेनिस संघटनेचे मानद सचिव राजीव देसाई यांनी जाहिर केले. 

स्पर्धेचा उदघाटन समारंभ सोमवार  २२ डिसेंबर  रोजी सायंकाळी ५ वाजता एम राज कुमार , पोलीस आयुक्त , सोलापूर  यांच्या शूभहस्ते व सुंदर अय्यर , अंतरिम महासचिव , अखिल भारतीय लॉन टेनिस संघटना तसेच मानद सचिव महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. 

स्पर्धेत उत्कृष्ट बॉल पिकरची सेवा बजावणा-या मुला-मुलींना भेटवस्तु देऊन गौरवण्यात येईल. स्पर्धेचे पात्रता फेरीचे सामने दि. २१ व २२ डिसेंबर रोजी तर मुख्य फेरीचे सामने दि. २३ ते २८ डिसेंबर  पर्यंत सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत खेळविले जातील.

या स्पर्धेच्या आयोजनासाठी आली पंजवानी, मेहुल पटेल, ब्रिजेश गांधी, केशव रेड्डी, सुहास अदमाने, श्रीधर देवसानी, असिम सिंदगी, सुनिल मदन, राजेश पवार, अभिजित टाकळीकर, डॉ. वैभव मेरु, डॉ साजिद सय्यद, उज्वल कोठारी, परेश शहा, संतोष फाटक , सतीश भोसले यांचे सहकार्य लाभले.

Post Views: 118
Previous Post

दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या सौरऊर्जा प्रकल्पाच्या इस्टीमेट साठी सुरुवात : आमदार नारायण पाटील 

Next Post

वालचंद ज्युनिअर कॉलेजमध्ये गुणवत्तेचा जल्लोष

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

वालचंद ज्युनिअर कॉलेजमध्ये गुणवत्तेचा जल्लोष

ताज्या बातम्या

हिंगोली जिल्ह्यात हेल्मेट बंधनकारक – डॉ. नीलाभ रोहन

April 21, 2026

राज्य कर्मचारी शिक्षक बेमुदत संपावर

April 21, 2026

सोयगाव शहरात पहिल्या बाल उद्यानाचे उद्घाटन संपन्न

April 21, 2026

पतीच्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून ; चुलतीनेच केला पुतण्याचा खून ..

April 21, 2026

पूर्णा नदी पात्रातून अवैध्य वाळू उपसा ; प्रशासनाच्या निष्क्रियतेवर नागरिकांचा संताप

April 21, 2026

गंधोदक हे केवळ जल नसून सकारात्मक ऊर्जेचा स्त्रोत

April 21, 2026

वाफळे येथे २७ एप्रिलला जिल्हा किशोर- किशोरी खो-खो स्पर्धा ..

April 21, 2026

मंठा तालुक्यात अनधिकृत रित्या अवैध्य वाळू उपसा

April 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0822143

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697