माळशिरस – सर्व सामान्य महिला केंद्रबिंदू मानून काम करा.महिलासाठी महिलांनी उभारलेली क्रेडीट सोसायटी महिलांना स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी निश्चीत काम करेल असा विश्वास राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय (मामा ) भरणे यांनी माळशिरस येथे भाग्यलक्ष्मी अर्बन वूमन को ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटीच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना व्यक्त केला .यावेळी व्यासपीठावर क्रेडीट सोसायटीच्या अध्यक्षा आड रेश्मा टेळे ,महाराष्ट्राचे मनसे नेते दिलीप धोत्रे ,जि प सदस्य गौतम माने ,,आड संजीवनी पाटील ,माणिकराव वाघमोडे ,किशोर सूळ,डॉ.मारुती पाटील,रमेश पाटील,बाळासाहेब सरगर ,सुरेश टेळे,शिवाजी देशमुख,संतोष वाघमोडे,विकास धाईजे,शामराव वाघमोडे, सोसायटीच्या अध्यक्षा आड रेश्मा टेळे यांच्यासह सर्व नूतन महिला संचालक ,महिला,नागरिक उपस्थित होते .
पुढे बोलताना भरणेमामा म्हणाले जीवन हे पुन्हा पुन्हा नाही ,आनंद घ्या ,आनंद द्या ,यशस्वी होण्यासाठी दोन पाऊले मागे सरकले पाहिजे ,तडजोड करा तरच यशस्वी व्हाल,राजकारण हे निवडणुकी पुरत केल पाहिजे,त्यानंतर टिका ,टिप्पणी विसरून समाजकारण केल पाहिजे.सर्वांचा आदर करून सर्वाना विश्वासात घेऊन काम करण्याची शिकवण कैं.अजितदादांनी आम्हाला दिली,
निवडणुका समोर नसताना कर्ज माफी
कोणतीही निवडणूक समोर नसताना ,शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे या उद्देशाने सरकारने कर्ज माफीचा निर्णय घेतला.तसेच मलिना आपल्या पायावरती उभा राहता यावे यासाठी महिलांना शेतकरी महिला म्हणून ओळख निर्माण करून दिली आहे ज्या महिलांच्या कुटुंबात शेती नाही परंतु शेती पूरक व्यवसाय करतात त्यानाही यामध्ये सहभागी करून घेतले आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस,उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उप मुख्यमंत्री सुनेत्रा पवार ,यांचे आभार .
शेतकऱ्याला एका दिवसात कर्ज मंजूर करणारी पुणे जिल्हा बँक
एखाद्या शेतकऱ्याला एका दिवसात कर्ज आवशक आहे,अशा शेतकऱ्यांना एका दिवसात कर्ज मंजूर करणारी भारतातील एकमेव पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक आहे.त्यामध्ये काम करण्याची संधी मिळाली हे माझ भाग्य
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नूतन अध्यक्षा रेश्मा टेळे यांनी करून सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले.सूत्रसंचलन बाळासाहेब सरगर यांनी केल




















