
वैराग : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आज, दिनांक ५ जून २०२६ रोजी ‘एकता महिला मंच’ शाखा जामगांव (आ), ता. बार्शी, जि. सोलापूर यांच्या वतीने एक स्तुत्य सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. मंचच्या सर्व सदस्यांनी एकत्र येत आपल्या घरासमोरील मोकळ्या जागेत आणि परिसरात विविध वृक्षांचे रोपण केले.
केवळ वृक्षारोपण करून न थांबता, लावलेल्या प्रत्येक झाडाचे मुलाप्रमाणे संगोपन करण्याचा आणि ते जगवण्याचा सामूहिक संकल्प व शपथ यावेळी सर्व महिलांनी घेतली. आजच्या वाढत्या प्रदूषणावर मात करण्यासाठी आणि निसर्गाचा समतोल राखण्यासाठी पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असल्याचे संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
या पर्यावरणपूरक उपक्रमाप्रसंगी ‘एकता महिला मंच’च्या सरिता कुलकर्णी, शामबाला सुतार, स्नेहल तळेकर, स्वाती सुतार, उषा ठाकूर यांच्यासह गावातील इतर प्रमुख पदाधिकारी व महिला सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महिलांनी स्वतःहून पुढे येत घेतलेल्या या पुढाकाराचे संपूर्ण परिसरातून कौतुक होत आहे.
Post Views: 12