पंढरपूर – तालुक्यातील गादेगाव येथील युवा शेतकरी गणेश शेंडगे (वय २४वर्ष, रा.गादेगाव, तालुका , पंढरपूर )यांचा पळशी येथील आपल्या शेतात पाण्याची मोटार सुरू करीत असताना अचानक विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला. एका तरुण होतकरू आणि कष्टाळू शेतकऱ्याचा असा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे,
शेतीमध्ये सतत नवनवीन प्रयोग करत प्रगतिशील शेतकरी म्हणून त्याचे नाव घेतले जात असे,ही दुर्दैवी घटना रविवार दि२३ऑगस्ट रोजी सकाळी ६वाजता घडली,गादेगाव येथील युवा शेतकरी गणेश शेंडगे यांची पळशी येथे शेती होती,
पिकांना पाणी देण्यासाठी ते मोटार सुरू करण्यासाठी गेले तेव्हा उजव्या हाताला भयानक विजेचा शॉक बसला आणि ते वेगाने बाजूला पडले ,
पंढरपूर तालुक्यातील आंबे या गावातही काही दिवसांपूर्वी ऐन वटपौर्णिमेच्या दिवशी शेतकरी दांपत्याचा शेतीला पाणी देताना विजेचा शॉक लागून मृत्यू झाला होता.गादेगाव येथे ही दुर्दैवी घटना समजताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.एका जिज्ञासू युवा शेतकऱ्याचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...




















