श्रीपूर – सद्य स्थितीत साखरेचे भाव दिवसें दिवस वाढत असल्याने एका बाजूला सर्व सामान्यांचे कंबरडे मोडत आहे . तर दुसऱ्या बापूला साठा करणाऱ्यांचे उखळ पांढरे होत आहे . या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पदरात काय पडणार हे प्रश्न चिन्हच आहे .
तसे बघितले तर साखर उद्योग निसर्गाच्या कधी जास्त पावसाने पूर परिस्थितीत तर कधी अत्यल्प पाऊस यामुळे या लहरीपणामुळे ऊसाचे नुकसान होते त्यामुळे कारखाने व शेतकरी अनेकदा अडचणीत येतात .
निसर्गाच्या या लहरीपणामुळे बरेचसे शेतकरी फळ बागांकडे वळले आहेत यात नगदी उत्पन्न देणारे केळीचे पिक वाढल्याने ऊसाचे क्षेत्र घटले आहे . तर साखर कारखान्यांनी आपली गाळप क्षमता वाढविली आहे . कमी ऊस व गाळप क्षमता जास्त यामुळे साखर उद्योग चालणेचे दिवस १८० वरून जेमतेम १०० दिवसवर आले आहे . यामुळे रोजगार कमी झाला .
यात आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे साखरेची एफआरपी व साखरेची एसआरपी केंद्रसरकार ठरवते यात असाला एफआरपी ३४०० रु . प्रतिटन देणे कारखान्यांवर शेतक्यांना देणे बंधनकारक आहे मात्र एसआरपी म्हणजे साखर विक्रीची किमंत ३१०० रु .आहे हे उलटे गणीत आहे . त्यामुळे साखर कारखाने अनेक वर्षा पासून एसआरपीची किमंत वाढवून ती ४१ रु . करावी अशी मागणी शासनाकडे करीत आहे . यावर शासनाने इथेनॉल पर्याय पुढे आणून यातून पैसे मिळणेचे पर्याय पुढे ठेवला .
आज हा पर्याय साखर उत्पादन घटनेस कारणीभूत ठरत आहे . कारण पूर्वी साखर तयार होऊन राहणाऱ्या मळी पासून इथेनॉल तयार केले जायचे परंतू आता रसापासूनच इथेनॉल निर्माण केले जाते त्याचा परिणाम साखर उत्पादनावर झाला साखरेच्या भाव वाढीचे हे एक कारण सांगितले जाते .
दुसरे कारण म्हणजे भारतात वर्षाला २८० लाख टन साखर लागते गतवर्षी साखरेचे उत्पादन ३२५ लाख टन अपेक्षित असताना जेमतेमच वर्षाला पुरेल एवढेच उत्पादन झाले त्याचा परिणाम साखर दरवाढीवर झाला .
बाजारातील साखरेची दरवाढ होत असताना शेतकर्यांचे डोळे मात्र भावाकडे लागले आहेत .
मात्र साखरेची दरवाढ आत्ता झाली आहे कारखान्यांनी या आधी विकलेल्या साखरेस एवढा भाव मिळाला नाही आता शेवटच्या टप्यात राहीलेली साखर किती आहे यावर बरेच गणित अवलंबून आहे .
त्यात बऱ्याच कारखान्यांनी एकरकमी दर दिला आहे .जे कारखाने पोळा व दिवाळी सणाला हप्ता देणार आहेत त्याकडे मात्र शेतकर्यांचे लक्ष लागले आहे .
हे सर्व होत असताना ग्राहकांना मात्र खिसा रिकामा करावा लागणार आहे . केंद्र सरकारने परिस्थितीचे गांभिर्य ओळखून तातडीने साखर आयातीचा निर्णय घेतला आहे . परंतू किती प्रमाणात दर नियंत्रणात येतील हे पाहणे महावाचे आहे .
Post Views: 3