Wednesday, July 22, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

अनेक नावांनी शहरात सक्रिय असलेला माओवादी अरूण भेलके दोषी, 8 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा…

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
December 15, 2022
in maharashtra
0
अनेक नावांनी शहरात सक्रिय असलेला माओवादी अरूण भेलके दोषी, 8 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा…
0
SHARES
12
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
प्रतिबंधित माओवादी संघटनेचा सक्रिय सदस्य अरुण भेलके याला न्यायालयाने काल दिनांक १४ डिसेंबर रोजी आठ वर्ष सक्तमजुरी आणि ४२ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायाधीश ए. आर. नावंदर यांनी हा निकाल दिला.
मुळ चंद्रपूर चा असलेला अरुण भेलके व त्याची पत्नी कांचन यांना महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) पुण्यातून येथून २०१४ मध्ये अटक केली होती. दोघांवर बेकायदा प्रतिबंधक हालचाल (युएपीए) कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली होती. भेलके हा येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. तर कांचन हिचा दीर्घ आजाराने ससून रूग्णालयात काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला आहे.
अरुण भेलके हा माओवादी पक्षाचा सक्रिय केडर होता. पुणे, मुंबईत काम करून तरुणांना नक्षल चळवळीत भरती करण्यासाठी हा शहरी भागात कार्यरत होता. पुण्यातील झोपडपट्टी भागातील तरुणांना माओवादी चळवळीत भरती करण्याचा प्रयत्नात असताना या दोघांना यांना अटक केली होती.
अरूण भेलके आणि कांचन हे दोघे प्रतिबंधित माओवादी पक्षाच्या “गोल्डन कॉरिडॉर कमिटी” चे सदस्य ही होते. हे अगोदर जंगलात सक्रिय होते. माओवादी पक्षाच्या धोरण व योजनेनुसार हे शहरी भागात विविध नावाने काम वाढवणे तसेच विविध संघटनांच्या मध्ये शिरकाव करून तरुणांमध्ये सरकारी व्यवस्थेच्या विरोधात असंतोष निर्माण करणे तसेच नक्षल चळवळीत भरती करणे चे काम भेलके व त्याची पत्नी करत होते.
अबब!एवढी खोटी नावे?
तपासात समोर आले कि दोघे मुंबई, रायगड, पुणे परिसर वेगवेगळ्या नावाने राहायचे. अरुण व कांचनने खालापूर, रायगड येथे भाड्याने खोली घेतली त्यावेळी करारनामा करताना त्यावर स्वतःचे नाव आकाश नारायण भगत आणि शीतल आकाश भगत असे सांगून सही केली. सदर करारनामा पोलिसांनी जप्त केला आहे. कांचन आजारी असल्याने हॉस्पिटलमध्ये उपचार घेताना स्वतःचे नाव शीतल भगत सांगायची. कांचनचा फोटो मात्र नाव शीतल भगत असे हॉस्पिटल पेशंट ओळखपत्र पोलिसांनी जप्त केले आहे. (कांचनचा जानेवारी महिन्यात आजारपणामुळे मृत्यू झाला)
अरुणने आदित्य सुरेश पाटील नावाने आधार कार्डही मिळवले ज्यावर फोटो मात्र त्याचाच होता व पत्ता गोवंडी येथील तत्कालीन नगरसेवकाच्या ऑफिसचा होता. पोलिसांनी हे आधार कार्ड जप्त केले आहे. कांचनकडे सोनाली पाटील नावाचे पॅन कार्ड होते ज्यावर तिचा स्वतःचा फोटो होता. पोलिसांनी हे पॅन कार्ड जप्त केले आहे. याशिवाय अरुणने राजन, संजय कांबळे वगैरे नावेही धारण केली होती तर कांचनला माओवादी संघटनेत भूमी नाव दिले होते असे तपासात समोर आले.
काही दिवसांपूर्वी शरणागत नक्षलवादी कृष्णाने न्यायालयात अरुण भेलकेला राजन म्हणून ओळखले व तो वरिष्ठ माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडे यास भेटत असल्याची माहितीही दिली. अरुण व कांचन जंगलातीलसशस्त्र माओवादी केडर सोबतही काम करायचे, त्यांच्यावर यासंबंधी पूर्वीचे गुन्हेही दाखल आहेत . अरुण खोट्या नावाने पुण्यातील कासेवाडी भागातील तरुणांच्या संपर्कात होते व त्यांना ब्रेनवाश करून नक्षल दलम मध्ये भरती करण्याच्या प्रयत्न होता, असे तपासात समोर आले.
Post Views: 88
Previous Post

ऐका :- कर्नाटक – महाराष्ट्र वादावर काय तोडगा निघाला – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह…

Next Post

वन अविघ्न पार्कवर पुन्हा आगीचं विघ्न ; शॉर्ट सर्किटमुळं दुर्घटना…

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
वन अविघ्न पार्कवर पुन्हा आगीचं विघ्न ; शॉर्ट सर्किटमुळं दुर्घटना…

वन अविघ्न पार्कवर पुन्हा आगीचं विघ्न ; शॉर्ट सर्किटमुळं दुर्घटना...

ताज्या बातम्या

सरकारी कर्मचाऱ्याबाबत बोलले बावनकुळे #viral #marathinews

July 21, 2026

आंदोलनात दिसला औरंगजेबाचा फोटो…….. #viral

July 21, 2026

मनपाच्या सभेत अनंत जाधवानी अकुलवार यांना धारेवर धरले #viral #marathinews #solapurnews

July 21, 2026

खुशखबर जिल्हा रुग्णालयात कार्डियाक केअर युनिट सेवा……

July 21, 2026

‘एक विशेष बाब लिहून बी टू रद्दचा आदेश आला #viral #marathinews #solapurnews

July 21, 2026

वारी दरम्यान खासगी दवाखाने सुरू राहणार…… #viral #marathinews #solapurnews

July 21, 2026

राम मंदिर देणगीचे राजकारण करू नका #viral#nationalnews

July 21, 2026

*सावधान ही दृशे तुम्हाला विचलित करू शकतात* समृद्धी महामार्गावर एकाच कुटुंबातील तिघांसह सहाजण ठार

July 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0990858

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!