पिलीव – माळशिरस तालुक्यातील झिंजेवस्ती (पिलीव) येथील अक्षय भिमराव खरात यांची महाराष्ट्र शासनाच्या ग्राम आरोग्य निरीक्षक पदी निवड झाली असून त्याना अहिल्यानगर जिल्हा परिषद सोलापूर येथे नियुक्ती मिळाली आहे .त्यांनी Institute of Banking Personal Selection एजन्सी तर्फे स्पर्धा परीक्षा होऊन सरळ सेवा भरतीतून निवड झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
अक्षय खरात हे झिंजेवस्ती कार्यक्षेत्रातील मदने वाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून चौथीपर्यंत शिक्षण घेऊन जवाहरलाल विद्यालय पिलीव (5वी ते 10वी) येथे शिक्षण घेतले असून बारावी शास्त्र शाखेपर्यंतचे शिक्षण
रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर येथे झाले असून बारावीनंतर टेक्निकल कॅम्पस सांगोला या ठिकाणी इलेक्ट्रिक आणि इंजिनियर ची पदवी घेऊन स्पर्धा परीक्षा दिली आहे .त्यांच्या ह्या निवडीबद्दल पिलीव, झिंजेवस्ती परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन व कौतुक होत आहे.
Views: 12