Sunday, June 14, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

…तर संस्कृतीचा ऱ्हास होण्यासाठी सर्वस्वी आपणच जबाबदार असू – अमित शाह

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 14, 2023
in india
0
…तर संस्कृतीचा ऱ्हास होण्यासाठी सर्वस्वी आपणच जबाबदार असू – अमित शाह
0
SHARES
44
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

15 ऑगस्ट 2023 ते 15 ऑगस्ट 2047 हा अमृत काळाचा कालखंड भारताला महान करण्याचा कालखंड आहे. आपल्या देशाला 15,000 वर्षे जुनी संस्कृती आणि इतिहास आहे. त्यांची ओळख जर आपण आपली बालके आणि युवा वर्गाला करून दिली नाही, तर आपल्या संस्कृतीचा ऱ्हास होण्यासाठी सर्वस्वी आपणच जबाबदार असू, असा इशारा केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी दिला. राष्ट्रीय सुरक्षा रक्षक दलाच्या विभागीय केंद्राच्या इमारतीची पायाभरणी तसेच गुजरात सरकारच्या विविध विकास कामांचा आरंभ शाह यांच्या हस्ते रविवारी झाला. त्यावेळी ते बोलत होते.

त्याआधी अमित शाह यांनी GIHED-CREDAI ने 450 सोसायटींमध्ये आयोजित केलेल्या वृक्षारोपण मोहीमेत भाग घेतला. त्यांनी मन्सा-बल्वा या 40 कोटी रुपये खर्चाच्या चौपदरी रस्त्याची पायाभरणीही केली, मन्सा येथे 2 कोटी रुपये खर्चून उभारलेल्या उपनिबंधक कार्यालयाचे उद्घाटन,मन्साच्या चंद्रसार गावात विकसित होत असलेल्या तलावाला भेट, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेरी माटी मेरा देश’ या मोहिमेअंतर्गत मातृभूमीसाठी प्राणांचे बलिदान करणाऱ्या वीरांच्या स्मृतीला आदर देण्यासाठी उभारलेल्या शिलाफलकाचे उद्घाटन आदी कार्यक्रमात सहभाग घेतला. राष्ट्रीय सुरक्षा रक्षक दलाचे महसंचालक एम ए. गणपती, यांच्या अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

प्रधानमंत्र्यांनी स्वातंत्र्यसैनिकांप्रती आदर आणि श्रद्धांजलीच्या भावनांची पेरणी केली

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव उपक्रमाचा समारोप 15 ऑगस्टला होईल, असे गृहमंत्री म्हणाले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभरातील लोकांच्या मनात 1857 ते 1947 या स्वातंत्र्यलढ्याच्या काळात आपल्या प्राणांचे बलिदान देऊन सर्वोच्च त्याग केलेल्या स्वातंत्र्यसैनिकांप्रती आदराची भावना आणि श्रद्धांजली या भावनांची पेरणी केली, असे अमित शाह म्हणाले. आम्ही जेव्हा मन्साजवळच्या गावात हुतात्म्याच्या स्मृतीस्थळावर भूमीपूजनासाठी गेलो होतो, तेव्हा गावातील 90 टक्के लोकांना 1857 च्या युद्धात आपल्या गावातील पाच जण 1857च्या चळवळीत शहीद झाल्याचे माहिती देखिल नव्हते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

जगातील सर्वांत मोठी लोकशाही म्हणून भारत अभिमानाने उभा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विस्मृतीत गेलेली अनेक स्थाने आणि स्वातंत्र्य चळवळीमधील हुताम्यांचे स्मरण करून अमर केले आहे, असे त्यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी यांनी देशाचा युवा वर्ग, किशोरवयीन आणि बालकांमध्ये देशभक्तीची ज्योत प्रज्वलित केली आहे. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत 17 वर्षांच्या खुदीराम बोस यांच्यापासून 80 वर्षांच्या कुंवर सिंहांपर्यंत प्रत्येक वयोगटातील स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. केवळ या स्वातंत्र्य सेनानींच्या त्यागामुळेच आज 75 वर्षांनंतर जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारत अभिमानाने उभा आहे.

दहशतावादाला अतिशय प्रभावी पद्धतीने तोंड देणारी एनएसजी प्रमुख संघटना

एनएसजीची मुंबई, चेन्नई, हैदराबाद आणि कोलकाता येथे चार प्रादेशिक केंद्रे आहेत आणि गुजरातमध्येही एनएसजीचे प्रादेशिक केंद्र स्थापन होणार आहे ही अतिशय अभिमानाची बाब आहे, असे त्यांनी सांगितले. दहशतावादाला अतिशय प्रभावी पद्धतीने तोंड देणारी एनएसजी ही देशातील प्रमुख संघटना आहे. एनएसजीने शेकडो दहशतवाद्यांचा खात्मा करून 100 पेक्षा जास्त यशस्वी कारवाया केल्या आहेत आणि सामान्य जनतेचे रक्षण केले आहे, असे शाह म्हणाले. मुंबई दहशतवादी हल्ल्यासह अनेक कारवायांमध्ये एनएसजीने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रादेशिक केंद्रासाठी 400 कोटी मंजूर केले असून लेकवदा येथील 60 एकर जागेवर 30 महिन्यांच्या आत त्याची उभारणी होईल, अशी माहिती शाह यांनी दिली.

Post Views: 103
Previous Post

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचे देशाला संबोधन….

Next Post

धनगर समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार कटिबद्ध – मुनगंटीवार

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
धनगर समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार कटिबद्ध – मुनगंटीवार

धनगर समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार कटिबद्ध - मुनगंटीवार

ताज्या बातम्या

१०.४६ लाखांच्या भेसळयुक्त खतप्रकरणी गुन्हा

June 13, 2026

दोन कारची समोरासमोर धडक ; एकाचा जागीच मृत्यू तर पाच जण किरकोळ जखमी

June 13, 2026
म्हशीच्या दुधात जर्शी गायीचे दुध भेसळ करण्याचे प्रमाण वाढले

म्हशीच्या दुधात जर्शी गायीचे दुध भेसळ करण्याचे प्रमाण वाढले

June 13, 2026
“इंग्रजांविरुद्ध आमचा बाप लढला; आमच्या नशिबी मात्र गुन्हेगारीचा कलंक लागला” – डॉ. अरुण जाधव

“इंग्रजांविरुद्ध आमचा बाप लढला; आमच्या नशिबी मात्र गुन्हेगारीचा कलंक लागला” – डॉ. अरुण जाधव

June 13, 2026

भररस्त्यात महिलेच्या गळ्यातील २ तोळे सोन्याचे गंठण लंपास

June 13, 2026
क्रिकेट स्पर्धा पत्रकारांना मानसिक, शारीरिकदृष्ट्या ऊर्जादायी : किरण साळी

क्रिकेट स्पर्धा पत्रकारांना मानसिक, शारीरिकदृष्ट्या ऊर्जादायी : किरण साळी

June 13, 2026
कन्हेरगावच्या वाड्या-वस्तीवरील वीजप्रश्नावर आमरण उपोषणाचा इशारा

कन्हेरगावच्या वाड्या-वस्तीवरील वीजप्रश्नावर आमरण उपोषणाचा इशारा

June 13, 2026
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी रोहित पवारांचे अन्नत्याग आंदोलन; भीमानगर चौकात जंगी सत्कार

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी रोहित पवारांचे अन्नत्याग आंदोलन; भीमानगर चौकात जंगी सत्कार

June 13, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

byतरुण भारत
June 12, 2026
0

सांगोला -    राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व आहे. त्यांचा विजय उमेदवारी जाहीर झाल्याच दिवशी निश्चित झाला असून आता केवळ...

सोलापुरात राजकीय ‘गेमचेंजर’ बैठक ; पवार गटाचे तीन आमदार महायुतीच्या दालनात !

byतरुण भारत
June 11, 2026
0

सोलापूर - विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर सोलापूरच्या राजकारणात अनपेक्षित घडामोडींना वेग आला असून, बालाजी सरोवर येथे झालेल्या एका बैठकीने नव्या राजकीय...

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

byतरुण भारत
June 10, 2026
0

सांगोला -  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि रोजगाराभिमुख शिक्षण देत फॅबटेक टेक्निकल कॅम्पसने सांगोल्याला राज्याच्या शैक्षणिक नकाशावर ठळक स्थान मिळवून...

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

byतरुण भारत
June 9, 2026
0

सोलापूर : भाजप- महायुतीचे विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी सोमवारी महापौर विनायक कोंड्याल यांची महापौर निवासस्थानी सदिच्छा भेट...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0908811

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697