Wednesday, July 1, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

महापालिका महिला व बालकल्याण समितीसह  ७ समिती सभापती पदासाठी ३ जुलै रोजी निवडणूक

तरुण भारतbyतरुण भारत
July 1, 2026
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
 सोलापूर : सोलापूर महापालिकेच्या कारभारात निर्णायक भूमिका बजावणाऱ्या स्वतंत्र बजेट असलेल्या महिला व बालकल्याण समितीसह विविध ७ समित्यांच्या सभापतीपदासाठी शुक्रवार, दि. ३ जुलै रोजी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात पुणे विभागीय आयुक्तांनी महाराष्ट्र महापालिका अधिनियम १९४९ चे कलम २१ तसेच समिती सभापती निवडणूक नियम २००७ व २००८ मधील तरतुदीनुसार अधिकृत आदेश निर्गमित केला आहे.
        शासनाने मुंबई प्रांतिक महापालिका अधिनियमाचे नियम २००७ आणि २००८ च्या अधिसूचनेनुसार सुधारणा करून मुंबई प्रांतिक महापालिका अधिनियम २००८ मध्ये संमत केलेले असून त्यानुसार समित्या व इतर समित्यांच्या सभापतींच्या निवडणुकीसाठीच्या विशेष बैठकीच्या अध्यक्षस्थानी विभागीय आयुक्त अथवा त्यांच्या प्रतिनिधी असेल अशी तरतूद करण्यात आलेली आहे. विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार, दि. ३ मे रोजी महापालिका कौन्सिल हाॅलमधील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात महापालिकेच्या स्थापत्य समिती, वैद्यकीय सहाय व आरोग्य समिती, विधी समिती, शहर सुधारणा समिती, मंड्या व उद्यान समिती, कामगार व समाज कल्याण समिती, महिला व बालकल्याण समिती या सभापती पदाची ही निवडणूक प्रक्रिया याच क्रमवारीनुसार पार पडेल. सकाळी ११ वाजता, यानंतर एकेक समितीला टप्प्याटप्प्याने ११:३०, १२ आणि दुपारी १२:३०, १,  व २ वाजता प्रत्येक समितीसाठी स्वतंत्रपणे मतदानाची वेळ निश्चित करण्यात आली आहे. निवडणूक अधिकारी म्हणून अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या उपस्थितीत हात उंचावून मतदान पद्धतीने सभापतींची निवड केली जाणार आहे. या निवडणुकीनंतर महापालिकेच्या विविध समित्यांची नव्याने रचना होऊन पुढील वर्षांचा कारभार अधिक वेगाने होण्याची अपेक्षा आहे.
नगरसेवकांची उत्सुकता
महापालिकेत सध्या भाजपाचे १०२ पैकी ८७ सदस्य असून आमदारांच्या गटांमध्ये सभापतीपदासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. महिला व बालकल्याण समितीचे सभापतीपद सर्वात महत्त्वाचे मानले जात असल्याने त्यासाठी चुरस पाहायला मिळत आहे. आरोग्य आणि शहर सुधारणा, स्थापत्य समितीकडेही विशेष लक्ष आहे. निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज दाखल करणे आवश्यक आहे.
 स्वतंत्र निधी समितीसाठी कोणाची वर्णी लागणार
 महापालिकेच्या विशेष सात समित्यांमध्ये प्रत्येक समितीत ९ सदस्य असून यामध्ये भाजपाचे ८ तर एमआयएमचा १ सदस्य आहे. या समित्यांमध्ये प्रथमच काँग्रेससह शिवसेनेचा एकही सदस्य नाही. महिला व बालकल्याण समितीत भाजपाचे सुनिता कामाठी, मंदाकिनी तोडकरी, वंदना गायकवाड, मृण्मयी गवळी, पूजा वाडेकर, श्वेता खरात, सुमन चाबुकस्वार, निर्मला जंगम (भाजपा) सफिया चौधरी (एमआयएम) असे असून भाजपाच्या सदस्यांमधून या स्वतंत्र निधी व सभापतींना वाहन असलेल्या समितीवर कोणाची वर्णी लागणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
 या ७ समित्यांच्या सभापती पदाची होणार निवड
 महापालिकेच्या दैनंदिन कारभारावर थेट परिणाम करणाऱ्या स्थापत्य समिती, वैद्यकीय सहाय्य व आरोग्य समिती, विधी समिती, शहर सुधारणा समिती, मंड्या व उद्यान समिती, कामगार व समाज कल्याण समिती आणि महिला व बाल कल्याण समिती या ७ समित्यांच्या सभापतीपदासाठी मतदान होणार आहे. या समित्या महापालिकेच्या बजेट, विकासकामे, आरोग्य, पायाभूत सुविधा आणि सामाजिक योजनांवर निर्णय घेतात.
नगरसचिव कार्यालयात आज
नामनिर्देशपत्र करणार दाखल
विविध समिती सभापती या पदासाठी विहित नमुन्यातील नामनिर्देशपत्र दिनांक २ जुलै २०२६ रोजी कार्यालयीन वेळेत सकाळी ११ ते दुपारी १.३० वाजेपर्यंत नगरसचिव, नगरसचिव यांचे कक्षात, कॉन्सिल हॉल, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर येथे स्विकारतील.
विहित नमून्यातील नामनिर्देशनपत्र नगरसचिव कार्यालयात कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहेत.
Post Views: 9
Previous Post

महिला संघटित झाल्या तर परिवर्तनाची नवी क्रांती घडते – जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

Next Post

पिलीव परीसरात जिओच्या नेटवर्कचा बट्ट्याबोळ ग्राहकांमध्ये प्रचंड संताप, तक्रारीची कोणीही दखल घेईनाच?

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

पिलीव परीसरात जिओच्या नेटवर्कचा बट्ट्याबोळ ग्राहकांमध्ये प्रचंड संताप, तक्रारीची कोणीही दखल घेईनाच?

ताज्या बातम्या

मनपा मुलांची केंद्र शाळा 9 मध्ये शालेय साहित्याचे वाटप

मनपा मुलांची केंद्र शाळा 9 मध्ये शालेय साहित्याचे वाटप

July 1, 2026
सोलापूर महापालिकेच्या विशेष स्वच्छता मोहिमेला प्रारंभ

सोलापूर महापालिकेच्या विशेष स्वच्छता मोहिमेला प्रारंभ

July 1, 2026
सोलापूरच्या पाणीपुरवठा, बस सेवा आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी

सोलापूरच्या पाणीपुरवठा, बस सेवा आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी

July 1, 2026

वालचंद’चे वरिष्ठ लिपिक भगवान खुरगांवकर यांचा सन्मान 

July 1, 2026
“वालचंद कनिष्ठ महाविद्यालय अकरावी  प्रवेशोत्सव जल्लोषात संपन्न “

“वालचंद कनिष्ठ महाविद्यालय अकरावी  प्रवेशोत्सव जल्लोषात संपन्न “

July 1, 2026
डॉ. देशपांडे संघाचा हबीब संघावर  दिमाखदार विजय

डॉ. देशपांडे संघाचा हबीब संघावर  दिमाखदार विजय

July 1, 2026
पद्मशाली शिक्षण संस्था येथे विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

पद्मशाली शिक्षण संस्था येथे विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

July 1, 2026

महापालिका भंगार चोरी प्रकरणात मोठी कारवाई

July 1, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0951919

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697