Tuesday, September 29, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

हवाईदल आणि सैन्य रुग्णालयाला 1.54 कोटींचा दंड

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
September 27, 2023
in india
0
हवाईदल आणि सैन्य रुग्णालयाला 1.54 कोटींचा दंड
0
SHARES
28
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

हवाई दलातील अधिकाऱ्याला दूषित रक्त पुरवठ्यामुळे एचआयव्हीची लागण झाली होती. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढत भारतीय हवाई दल आणि सैन्य रुग्णालया 1 कोटी 54 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. सैन्य रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे हे अधिकारी एचआयव्ही संक्रमित झाले होते.

याचिकाकर्ते माजी हवाई दल अधिकाऱ्यावर 2002 साली लष्करी रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. हे अधिकारी 13 डिसेंबर 2001 मध्ये संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरु केलेल्या ‘ऑपरेशन पराक्रम’ चा एक भाग होते. माजी हवाई दल अधिकारी ‘ऑपरेशन पराक्रम’ दरम्यान ड्युटीवर असताना आजारी पडले होते. त्यांना जुलै 2002 मध्ये सैन्य रुग्णालयात भरती करण्यात आले होते. जिथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले आणि यावेळी त्यांना रक्त चढवण्यात आले होते. त्यानंतर 2014 मध्ये त्यांना एचआयव्हीची लागण झाल्याची माहिती पुढे आली होती. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी, 26 सप्टेंबर रोजी सुनावणी पार पडली. भारतीय हवाई दलाला माजी हवाई दल अधिकाऱ्याला 1.54 कोटी रुपये भरपाई देण्याचे निर्देश भारतीय लष्कर आणि हवाई दलाला देण्यात आले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी दिलेल्या आदेशात नमूद केल्यानुसार, वैद्यकीय निष्काळजीपणामुळे याचिकाकर्ता 1 कोटी 54 लाख 73 हजार रुपयांच्या नुकसान भरपाईसाठी पात्र आहे. यासाठी व्यक्ती कोणालाही जबाबदार धरू शकत नाही, त्यामुळे भारतीय हवाई दल आणि भारतीय लष्कर या निष्काळजीपणासाठी जबाबदार आहे. ही रक्कम भारतीय हवाई दल 6 आठवड्यांच्या आत याचिकाकर्त्याला देईल. भारतीय हवाई दल लष्कराकडून अर्धी रक्कम मागू शकतात. या माजी हवाई दल अधिकाऱ्याची सर्व देणी 6 आठवड्यांच्या आत देय केले जावे. सर्वोच्च न्यायालयाने अशा प्रकरणांच्या संदर्भात सरकार, न्यायालये, न्यायाधिकरण, आयोग आणि अर्ध-न्यायिक संस्थांसाठी एचआयव्ही कायदा, 2017 अंतर्गत काही मार्गदर्शक तत्त्वे देखील जारी केली आहेत.

Post Views: 131
Previous Post

चंद्रपूरात गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन मोहिमेची चित्ररथाद्वारे जनजागृती

Next Post

नाशिकच्या गिरणा सहकारी बँकेचा परवाना रद्द

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
नाशिकच्या गिरणा सहकारी बँकेचा परवाना रद्द

नाशिकच्या गिरणा सहकारी बँकेचा परवाना रद्द

ताज्या बातम्या

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातून चारा व मुरघास बाहेर नेण्यास बंदी #viral #solapurnews

September 29, 2026

युवा महोत्सवाचा पहिला दिवस गाजला#solapur

September 29, 2026

दोन मुख्य जलवाहिन्या फुटल्या; शहराचे पाणी रोटेशन पाच दिवसआड़ #viral #news #solapurnews #latestnews

September 28, 2026
हेरिटेज मणिधारी  संस्थेच्या सभेत खेळीमेळीने सर्व विषय एकमताने मंजूर

हेरिटेज मणिधारी  संस्थेच्या सभेत खेळीमेळीने सर्व विषय एकमताने मंजूर

September 28, 2026

सांगोला विद्यामंदिरमध्ये आज संत विचारांचा महाजागर

September 28, 2026

पैशांच्या व्यवहारातून सोलापूरजवळील कुंभारीत ५४ वर्षीय व्यक्तीची कुऱ्हाडीने हत्या

September 28, 2026
अक्कलकोट प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचा ११ टक्के लाभांश; ६७ वी वार्षिक सभा उत्साहात

अक्कलकोट प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचा ११ टक्के लाभांश; ६७ वी वार्षिक सभा उत्साहात

September 28, 2026
भावी अभियंत्यांना यशाची नवी दिशा; सिंहगडमध्ये दोन दिवसीय परिचय कार्यक्रम उत्साहात

भावी अभियंत्यांना यशाची नवी दिशा; सिंहगडमध्ये दोन दिवसीय परिचय कार्यक्रम उत्साहात

September 28, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1275424

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!