सांगोला – सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ अमृत व श्रीमुनी गणपत घेरडे मेडिकल चॅरिटेबल ट्रस्ट रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या व जगद्गुरु श्री.संत तुकाराम महाराज जनसेवा प्रतिष्ठान, पुणे यांचे संयुक्त विद्यमाने आज मंगळवार दि.२९ सप्टेंबर रोजी स.१० वा. सांगोला विद्यामंदिर प्रशाला येथे १० हजार विद्यार्थ्यांना तुकोबांची अभंग पंचविशी तर संस्थेतील ३५० शिक्षकांना तुकाराम गाथा सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. या प्रेरणादायी सोहळ्यासाठी सोलापूरचे जिल्हाधिकारी एस.कार्तिकेयन, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, आ.डॉ.बाबासाहेब देशमुख, म्हाडाचे पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी राहुल साकोरे, सा.बां.प्रा.वि.पुणेचे मुख्य अभियंता अनिल पवार, डॉ.आंबेडकरी शेती विकास व संशोधन संस्थेचे ललित बाबर, वारी आपल्या दारीचे मार्गदर्शक अविनाश काकडे आणि सोलापूरचे आंतरराष्ट्रीय चित्रकार सचिन खरात उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती कार्यक्रमाचे स्वागतोत्सुक सां.ता.शि.प्र.मंडळाचे अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके, घेरडे ट्रस्टचे सचिव डॉ.सुदर्शन घेरडे, जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष हभप.अशोकराव काळे यांनी दिली.
चौकट-
बापूसाहेबांच्या वैचारिक परंपरेतील एक सुवर्णक्षण
संस्थेने अमृत महोत्सवी वर्षात सामाजिक बांधिलकी जपत डीआरडीओचे माजी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.अशोक नगरकर यांचे विशेष व्याख्यान, सांगोला तालुका पत्रकार कार्यशाळा व कृतज्ञता सोहळा आणि माजी सैनिकांचा रक्षाबंधन सोहळा हे आयोजन महत्त्वपूर्ण ठरले. केवळ शालेय शिक्षण न देता संत साहित्याच्या माध्यमातून विद्यार्थी आणि शिक्षकांची नैतिक जडणघडण करणे हे या महाग्रंथदान सोहळ्याचे सर्वांत मोठे वेगळेपण असून हा ज्ञानयज्ञ गुरुवर्य बापूसाहेबांच्या वैचारिक परंपरेतील एक सुवर्णक्षण ठरणार आहे.
Post Views: 10