सोलापूर : भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडी, महाराष्ट्र प्रदेश, हृदयम सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ, शेळगी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सर्वरोग निदान मोफत आरोग्य शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
हृदयम सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. शैलेश जगदीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या महाआरोग्य शिबिरामध्ये विविध आजारांची मोफत तपासणी व तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले. शेळगीसह परिसरातील मोठ्या संख्येने नागरिकांनी शिबिराला भेट देत आरोग्य तपासणी करून तज्ज्ञांचा सल्ला घेतला.
शिबिराचे उद्घाटन भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रंगनाथ बंग, शेळगीचे पोलीस पाटील जगदीश मल्लिकार्जुन पाटील, प्रभाग क्रमांक १ चे नगरसेवक अविनाश पाटील, समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष शिवलिंग शहाबादे, उपाध्यक्ष चंद्रकांत रमणशेट्टी, डॉ. राजेश फडकुले आणि डॉ. सचिन बोणगारगी यांची प्रमुख उपस्थिती होती.
या शिबिरामध्ये हृदयरोगतज्ज्ञ डॉ. शैलेश पाटील यांच्यासह डॉ. अमोल पाटील, डॉ. सुनील हिलालपुरे, डॉ. अक्षय हवालदार, डॉ. अमर विभुते, डॉ. श्रेय आराध्ये, डॉ. मुक्तेश्वर शेटे, डॉ. अक्षय हनमशेट्टी, डॉ. चंद्रशेखर सालकी, डॉ. दीपिका चिंचोली आणि डॉ. नायडू यांनी रुग्णांची तपासणी करून आवश्यक वैद्यकीय सल्ला दिला.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी हृदयम सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांसह पंडित दीनदयाळ डेंटल हॉस्पिटल, केगाव आणि श्री शंकरशेठ साबळे हॉस्पिटल, बाळे येथील कर्मचारी वर्गाने मोलाचे सहकार्य केले.
यावेळी कल्याणी बोरगावकर, नागनाथ बाळशेट्टी, सोमनाथ चौगुले, योगीनाथ धपाधुळे, अशोक धपाधुळे, प्रशांत शिवगुंडे, धनराज पाटील, शाम ढवणे, अल्ताफ इनामदार, मेघराज बोरगावकर तसेच समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 5