बार्शी – फेब्रुवारी २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (५ वी) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर २ ने यशाची परंपरा कायम राखत शाळेचा निकाल ९६.२९% लागला असून तब्बल २६ विध्यार्थी पात्र झाले आहेत.या परीक्षेला २७ विध्यार्थी सहभागी झाले होते.या २६ विद्यार्थ्यापैकी तब्बल १३ विध्यार्थ्यांनी २०० पेक्षा जास्त गुण मिळविले आहेत.तर शाळेतील विध्यार्थी सर्वज्ञ सतीश वाघ व मल्हार अनंत सदावर्ते या विद्यार्थ्यांनी ३०० पैकी २४६ गुण मिळविले आहेत तर कु. आरोही संतोष पाटील या विद्यार्थीनींनी २४० गुण मिळविले आहेत. दिव्या विलास पांगरे-२२८ गुण, श्रवण वैजीनाथ देवकर-२२६ गुण, श्रेया सुधाकर सुतार २२४ गुण, विवेक अतुल जाधव २१८ गुण, ईश्वरी राजेंद्र बोटे २१४ गुण, ऋषिकेश रामचंद्र बरचे २१०
गुण, आर्यन आनंद ठोगे २१० गुण, समर्थ सचिन पाटील २०६ गुण, सार्थक तानाजी शिंदे २०४ गुण, सार्थक सिद्धेश्वर माळी २०० गुण असे गुण विध्यर्थ्यांनी मिळविले आहेत. या विध्यार्थ्यांना वर्गशिक्षिका श्रीमती दिपाली गोरे यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल मुख्याध्यापक श्री काळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ.सविता भोंग, उपाध्यक्ष श्रीमती योगिता सदावर्ते, सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांनी सर्व विध्यार्थी ,वर्गशिक्षिका श्रीमती दिपाली गोरे ,यांचे अभिनंदन केले आहे.
Post Views: 10