मंगळवेढा – मारापूर येथील कामाजी तानाजी सकट (वय 28) वर्षे हे घरातून कोणास काही न सांगता कोठेतरी निघून गेले असून ते अदयापपर्यंत घरी आले नसल्याने त्यांचा शोध व्हावा अशी तक्रार त्यांच्या पत्नीने मंगळवेढा पोलिसात दिली असून पोलिस त्या पतीचा कसून शोध घेत आहेत.
यातील खबर देणारे स्वप्नाली सकट वय 25 वर्षे,ही सदर तरूणाची पत्नी असून दि.28 डिसेंबर रोजी सकाळी 9.00 ते दुपारी 1.00 च्या दरम्यान खबर देणार्याचे पती कामाजी सकट हे कोणास काही न सांगता मारापूर येथील राहत्या घरातून कोठेतरी निघून गेले आहेत ते अदयापर्यंत घरी आले नाहीत.त्यांचा शोध होवून मिळणेस पोलिस प्रशासनास विनंती केली आहे.
त्याचे वर्णन पुढील प्रमाणे- उंची-5.5 इंच,रंग-सावळा,अंगात वांगी कलरचा टि शर्ट,गे्र कलरची जीन पँट,शरीर बांधा सडपातळ,शिक्षण -बी.ए.उजव्या हातावर 2611 असे लिहिलेले,बोली भाषा मराठी अशा वर्णनाचा तरूण कोणाच्या निदर्शनास आल्यास त्यांनी तपासिक अंमलदार पोलिस नाईक ईश्वर दुधाळ (मोबा.9325084042) या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.


























