सोलापूर : लग्न करण्याचे आमिष दाखवून एका तीस वर्षांच्या तरुणीवर वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी सलगर वस्ती पोलिस ठाण्यात एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुल शशीकांत गायकवाड (वय ३२, रा. वसंत जाधव पार्क, आरटीओ रोड, सोलापूर ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून याबाबत खुद्द पीडित तरुणीने फिर्याद दिली आहे.
२०२२ मध्ये यातील आरोपी व यातील फिर्यादी तरुणीची ओळख झाली होती. या ओळखीतून आरोपीने जवळीकता वाढवून लग्नाचे आमिष दाखवून २०२२ ते २०२६ या दरम्यान फिर्यादीच्या घरी, शहरा जवळील लॉज येथे नेऊन लैंगिक अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे .दरम्यान या प्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल होताच संबंधित आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे . सहाय्यक पोलीस निरीक्षक खामकर या गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.
Post Views: 8