सोलापूर : “मै तुझसे प्यार करता हु ,अगर तु मुझसे बात नही करोगी तो मै तेरे फोटो व्हायरल कर दूंगा,” अशी धमकी देऊन एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना नई जिंदगी परिसरात घडली . दरम्यान या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पॉक्सोअंतर्गत दोघा तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जाफर फिरोज पठाण व शादाब शायरअली शेख ऊर्फ शादाब इरफान मुल्ला (दोघे राहणार मगरेवाडी ,सोलापूर )अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून याबाबत पीडित मुलीच्या आईने फिर्यादी आहे .
हा प्रकार नई जिंदगी रोडवरील हॉटेलसमोर मार्च २०२६ ते ११ मे २०२६ दरम्यान घडला. आरोपी जाफर पठाण याने अल्पवयीन मुलीला भीती दाखवून प्रेमसंबंधातून बोलण्यास भाग पाडले. तसेच तिचा दुसरा साथीदार शादाब शायरअली शेख ऊर्फ शादाब इरफान मुल्ला यानेही, “तुझे आणि जाफरचे फोटो माझ्याकडे आहेत, तू त्याच्याशी बोलली नाहीस तर फोटो व्हायरल करेन,” अशी धमकी देऊन तिला मानसिक त्रास दिला व तिची छेड काढल्याचे फिर्यादीत म्हटले आहे . फौजदार गाढवे हे गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.
Post Views: 12