सोलापूर : असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्स, सोलापूर व एन्व्हायरोसेफ कन्सल्टंट यांच्या संयुक्त विद्यमाने बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अशोक चौक येथील पोलीस मुख्यालय परिसरात झालेल्या या शिबिरात सुमारे ३०० कामगारांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
शिबिराचे उद्घाटन पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्या हस्ते झाले. यावेळी वैशंपायन वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. ऋत्विक जयकर प्रमुख उपस्थित होते. तसेच असोसिएशनचे अध्यक्ष इंजि. बी. एम. जाधव, सचिव संतोषकुमार बायस यांच्यासह पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी बांधकाम कामगारांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले. समाजातील विविध घटकांसाठी अशा प्रकारच्या आरोग्यविषयक उपक्रमांची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना असोसिएशनचे अध्यक्ष इंजि. भगवान जाधव यांनी केली. सूत्रसंचालन कणकी यांनी केले, तर गोकुळ चितारी यांनी आभार मानले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी इंजि. इफ्तिकार नदाफ, प्रशांत मोरे, गणेश इंदापूरे, मनोज महेंद्रकर, सुनील दूधगुंडी, जवाहर उपासे, नितीन पवार, बोगासर, मनोज आणि नामदेव म्हेत्रे यांनी विशेष परिश्रम घेतले. याशिवाय असोसिएशनचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 12