सोलापूर – मध्य रेल्वे पुणे विभागातील ‘दौंड-मनमाड दुपदरीकरण प्रकल्पा’च्या कामाच्या अंमलबजावणीसाठी, विसापूर-रांजणगाव-सरोळा स्थानकांदरम्यान दि. २८, २९ आणि ३० मे २०२६ रोजी ‘ट्रॅफिक ब्लॉक’ (रेल्वे वाहतूक खंडित करण्याची कामे) घेणार आहे. या ब्लॉकमुळे सोलापूर विभागातील स्थानकांमार्गे धावणाऱ्या गाड्यांच्या संचालनावर परिणाम होणार असल्याची माहिती रेल्वे प्रधासनाच्यावतीने देण्यात आली.
यामध्ये गाड्यांचा मार्ग दर्शविलेल्या मार्गांवरून वळवण्यात येनार आहे. गाडी क्रमांक १२६२७ केएसआर बंगळुरू-नवी दिल्ली कर्नाटक एक्सप्रेस, जिचा प्रवास दिनांक २७.०५.२०२६ आणि २९.०५.२०२६ रोजी सुरू होत आहे, ती सोलापूर-कुर्डुवाडी-लातूर रोड-परभणी-छत्रपती संभाजीनगर-मनमाड या मार्गावरून वळवण्यात येईल.
गाडी क्रमांक २०६५७ एस.एस.एस. हुबळी-हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस, जिचा प्रवास दिनांक २९.०५.२०२६ रोजी सुरू होत आहे, ती सोलापूर-कुर्डुवाडी-लातूर रोड-परभणी-छत्रपती संभाजीनगर-मनमाड या मार्गावरून वळवण्यात येईल.
गाडी क्रमांक १२६२८ नवी दिल्ली-केएसआर बंगळुरू कर्नाटक एक्सप्रेस, जिचा प्रवास दिनांक २९.०५.२०२६ रोजी सुरू होत आहे, तिला सोलापूर-दौंड विभागात १ तास ३० मिनिटे उशिरा (विलंबित) केले जाईल.
पायाभूत सुविधांची देखभाल आणि सुरक्षिततेसाठी ही सुधारणा कामे (अपग्रेडेशन ब्लॉक्स) करणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे; प्रवाशांनी कृपया या परिणामांची नोंद घ्यावी आणि त्यानुसार आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, अशी विनंती करण्यात येत आहे.





















