
पिलीव – माळशिरस तालुक्यातील साळमुखवाडी येथे अहिल्यादेवी जयंतीनिमित्त अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान व विकास कोकरे मिञ मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 61 जणांनी रक्तदान केले .यावेळी रक्त संकलन सांगोला ब्लड बॅकेचयावतीने रक्त संकलन करण्यात आले.या रक्तदान शिबिराची सुरवात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पुजन करुन करण्यात आले.सदरच्या रक्तदान शिबिराचे आयोजन साळमुखवाडी येथील हाॅटेल जय मल्हार याठिकाणी करण्यात आले होते.यावेळी अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान व विकास कोकरे मिञ मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिरासारखा अतिशय स्तुत्य उपक्रम राबविलयाबददल विकास कोकरे मिञ मंडळाचे कौतुक होत आहे .





















