Sunday, May 31, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

चांद्रयान-3 मोहिमेमुळे भारताकडे अधिकाधिक आंतरराष्ट्रीय सहयोगी आकर्षित – जितेंद्र सिंह

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 23, 2023
in india
0
चांद्रयान-3 मोहिमेमुळे भारताकडे अधिकाधिक आंतरराष्ट्रीय सहयोगी आकर्षित – जितेंद्र सिंह
0
SHARES
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

चांद्रयान-3 मोहिमेमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरुन भारताकडे अधिकाधिक प्रमाणात सहयोगी आकर्षित होत आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान, अवकाश विभागाचे राज्यमंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी केले. भारत- मॉरीशस संयुक्त उपग्रहाच्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी मॉरीशसचे माहिती तंत्रज्ञान, दळणवळण आणि नवोन्मेष (एमआयटीसीआय) मंत्री दर्शानंद दीपक बाल्गोबीन यांच्या नेतृत्वाखालील उच्च-स्तरीय प्रतिनिधी मंडळाने मंगळवारी केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांची भेट घेतली. त्यावेळी डॉ.जितेंद्र सिंह बोलत होते.

त्रयस्थ मोहिमांना पाठबळ देण्यासाठी मॉरीशसमध्ये उभारलेल्या इस्रोच्या भौगोलिक केंद्राचा वापर करू देण्याबाबत देखील भारत आणि मॉरीशस यांनी संमती दर्शवली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उल्लेखनीय अमेरिका भेटीदरम्यान आर्टमिस अॅकॉर्डसवर स्वाक्षऱ्या करून भारताने जगातील इतर देशांशी अवकाश क्षेत्रात सहयोगी संबंध प्रस्थापित करण्यासाठी तुल्यबळ भागीदार म्हणून स्वतःची क्षमता दाखवून दिली आहे असे केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी यावेळी सांगितले.

मॉरीशसचे मंत्री बाल्गोबीन यांनी याआधी म्हणजे 17 ऑगस्ट 2023 रोजी बेंगळूरू येथील इस्रोच्या केंद्राला भेट दिली. या भेटीदरम्यान इस्रोच्या अधिकाऱ्यांनी भारत- मॉरीशस संयुक्त उपग्रहासंदर्भातील तांत्रिक तपशील तसेच या उपग्रहाच्या उपयुक्ततेच्या क्षमता यांची माहिती बाल्गोबीन यांना दिली.

आजच्या भेटीदरम्यान दोन्ही मंत्र्यांनी मॉरीशसमध्ये उभारलेल्या इस्रोच्या ग्राउंड स्टेशनच्या व्याप्तीचा विस्तार करून त्यात युरोपियन अवकाश संस्थेसह इतर त्रयस्थ मोहिमांचा समावेश करण्याबाबत संमती दर्शवली. तसेच, अशा प्रकारच्या सहयोगी संबंधांच्या सुरळीत स्थापनेसाठी सध्या अस्तित्वात असलेल्या सामंजस्य करारातील सुधारणेवर स्वाक्षऱ्या करण्याला देखील त्यांनी मान्यता दिली.

उपग्रहांचा तसेच प्रक्षेपकांचा मागोवा घेण्यासाठी गेल्या 3 दशकांहून अधिक काळ मॉरीशस येथे इस्रोचे हे केंद्र कार्यरत आहे. सध्या या केंद्रामध्ये दोन अँटेना (11 मीटर व्यास असलेल्या) सतत कार्यरत असून त्यांचे संचालन मॉरीशसमधून केले जाते.

केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह म्हणाले की भारताने 1999 मध्ये दूरस्थ संवेदन केंद्राची उभारणी करून आणि उपग्रहाकडून मिळालेली मॉरीशसच्या भूभागाशी संबंधित माहिती पुरवून मॉरीशसला मदत केली आहे. तसेच अवकाश तंत्रज्ञानाच्या वापराबाबत भारतीय संस्थांनी दिलेल्या प्रशिक्षण अभ्यासक्रमांचा लाभ मॉरीशसच्या अधिकाऱ्यांनी घेतला आहे अशी माहिती देखील त्यांनी दिली

केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह आणि बाल्गोबीन यांनी अवकाश क्षेत्रातील सहकार्यासारख्या मुद्द्यांवर देखील चर्चा केली, त्यासाठी त्यांनी (i) उपग्रहाकडून मिळालेली पृथ्वीच्या निरीक्षणाशी संबंधित माहिती; (ii) उपग्रहाने पुरवलेली माहिती, भूअवकाशीय स्तर तसेच मॉरीशसशी संबंधित मूल्यवर्धित सेवा यांच्यासह ‘भारत- मॉरीशस अवकाश पोर्टल’चे विकसन;(iii)अवकाश क्षेत्रातील उद्योगांच्या पातळीवर सहयोगी संबंध स्थापन करण्यासाठी चर्चांना सुरुवात करणे यावर विचारविनिमय केला.

Post Views: 155
Previous Post

चांद्रयान-3 चे आज ऐतिहासिक लँडिंग; संध्याकाळी 6 वाजून 4 मिनीटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँड करणार….

Next Post

चांद्रयान लँडिंग होण्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात विशेष कार्यक्रमांचे आयोजन

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
चांद्रयान लँडिंग होण्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात विशेष कार्यक्रमांचे आयोजन

चांद्रयान लँडिंग होण्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात विशेष कार्यक्रमांचे आयोजन

ताज्या बातम्या

पोलिसांनी सात तासात मुलीला केले नातेवाईकांच्या स्वाधीन #solapurnews #news #marathinews

May 31, 2026

दिल्ली मुंबईसह अनेक ठिकाणी हल्ले करण्याचा कट उधळला #viral #news

May 31, 2026

जरांगे पाटील यांनी मध्यरात्री १ वाजता उपोषण घेतले मागे #viral #news #marathinews

May 31, 2026

पीच तयार करताना रोलरखाली गेल्याने १५ वर्षीय मुलाचा मृत्यू #marathinews #news

May 31, 2026

आनंदोत्सवात साजरी झाली राजमाता अहिल्यादेवी यांची जयंती

May 31, 2026
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शिक्षा वर्गात वृक्षारोपन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शिक्षा वर्गात वृक्षारोपन

May 31, 2026
पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांची सीडबॉल कार्याशाळेस भेट

पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांची सीडबॉल कार्याशाळेस भेट

May 31, 2026

महापालिका शाळांमध्ये सोमवार पासून नव्या पाठ्यपुस्तकांचे बीटनिहाय वाटप

May 31, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

byतरुण भारत
May 31, 2026
0

टेंभुर्णी - (ता.माढा) येथे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या पदाधिकारी मेळावा व नवीन पदाधिकारी निवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या...

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0888172

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697