Monday, June 1, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

काका-पुतण्याच्या लढाईत ‘मातोश्री’ची एन्ट्री : साजन पाचपुतेंचा ठाकरे गटात प्रवेश

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
September 4, 2023
in maharashtra
0
काका-पुतण्याच्या लढाईत ‘मातोश्री’ची एन्ट्री : साजन पाचपुतेंचा ठाकरे गटात प्रवेश
0
SHARES
32
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

राज्याच्या राजकारणात काका पुतण्यांचा संघर्ष आपण पाहत आहोत. तसाच आणखी एक संघर्ष बलाढ्य राजकारणी असलेल्या अहमदनगर जिल्ह्यात दिसून येत आहे. श्रीगोंद्याचे आमदार बबनराव पाचपुते यांना पुतण्याने ग्रामपंचायत आणि बाजार समितीमध्ये धक्के दिलेच. परंतु आता पुतण्या थेट शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात दाखल होत आहे. दिवंगत भाजप नेते सदाशिव पाचपुते यांचे पुत्र आणि श्रीगोंदा तालुक्यातील सर्वात मोठ्या काष्टी ग्रामपंचायतीचे सरपंच साजन पाचपुते ठाकरेंच्या गोटात पक्षात प्रवेश करणार आहेत.

बबनराव पाचपुते यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, यानिमित्ताने वर्षभरापासून सुरु असलेल्या काका-पुतण्याच्या वादात आता थेट उद्धव ठाकरे यांनी एन्ट्री घेतली आहे. मात्र श्रीगोंद्याची जागा राष्ट्रवादीकडे असल्याने आणि ठाकरेंची फारशी ताकद नसतानाही साजन पाचपुतेंनी यांनी नेमकी कोणती राजकीय गणित मांडून ठाकरेंच्या गटाचा पर्याय निवडला हे अद्यापही गुलदस्त्यात आहे.

काका-पुतण्यात उभा दावा :

श्रीगोंदा तालुका पाचपुते कुटुंबियांचा बालेकिल्ला मानला जातो. बबनराव पाचपुते यांनी आतापर्यंत सातवेळा इथली आमदारकी भुषविली आहे. मात्र त्यांना राजकारणात उभे करण्यास सदाशिव पाचपुते यांनी मोठी भूमिका बजावली. शिवाय त्यांच्याअनुपस्थितीत जिल्हा परिषद, बाजार समितीचे राजकारण सदाशिव पाचपुते यांनीच संभाळले. दोन वर्षांपूर्वी सदाशिव यांचे निधन झाले, त्यानंतरही हे कुटुंब एकत्रच राहिलं असं सांगितलं जात होतं. स्वतः साजन यांनीही आपण आमदार पाचपुते यांच्यासोबतच असल्याचे सांगितले होते.

मात्र वडिलांच्या निधनानंतर साजन यांनी राजकीय तयारी सुरु केली. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटण्याचे,  तालुक्यातील सर्वपक्षीय लोकांना जोडण्याचे काम सुरू केले. शिवाय कारखान्याची जबाबदारी खांद्यावर घेत साजन व सुदर्शन या बंधूंनी चोख पार पाडली. मात्र साजन पाचपुचे ही तयारी जिल्हा परिषदेसाठी करत असावेत असे सांगितले गेले. पण डिसेंबर 2022 मध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांनी विरोधी भूमिका घेतली.

बबनराव पाचपुते यांनी मुलगा प्रताप यांना सरपंचपदासाठी उभे केले होते. तर त्यांच्याविरोधात साजन यांनी मैदानात उडी घेतली. ग्रामपंचायत बबनराव पाचपुते यांच्याकडे गेली पण थेट जनतेतून सरपंचपदाची निवडणूक जिंकत त्यांनी काकांना चितपट केले. त्यानंतर बाजार समिती निवडणुकीतही त्यांनी राष्ट्रवादीच्या राहुल जगताप यांच्या पॅनेलमधून निवडणूक लढवत काकांच्या पॅनेलला पराभावाचा धक्का दिला होता.

ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत आणि साजन पाचपुते यांचे जवळचे संबंध आहेत. गत महिन्यात त्यांनी मुंबईत उध्दव ठाकरे यांचीही भेट घेतली होती. त्यानंतर आता साजन पाचपुते आज ठाकरे गटात प्रवेश करत आहेत. मात्र श्रीगोंद्याची जागा सध्या राष्ट्रवादीकडे आहे. गतवेळी माघार घेतलेले राहुल जगताप यांनी तयारी सुरु केली आहे. अशात जर राष्ट्रवादीला नाही मिळाली तर काँग्रेसच्या नागवडे कुटुंबियांनीही तयारी सुरु केली आहे. त्यामुळे साजन पाचपुते यांनी श्रीगोंद्याच्या जागेसाठीची समीकरण कशी मांडली हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

Post Views: 238
Previous Post

सुशील कुमार शिंदे यांचा आज वाढदिवस ! वाढदिवसानिमित्त त्यांचा थोडक्यात राजकीय प्रवास…..

Next Post

पंकजा मुंडेंनी भगवान बाबांचं घेतलं दर्शन, पाहा !

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
पंकजा मुंडेंनी भगवान बाबांचं घेतलं दर्शन, पाहा !

पंकजा मुंडेंनी भगवान बाबांचं घेतलं दर्शन, पाहा !

ताज्या बातम्या

माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी विधानपरिषद निवडणुकीसाठी भरला अर्ज #solapurnews #news #marathinews

June 1, 2026

पाच लाखांसाठी विवाहितेला मुलींसह घराबाहेर काढले

June 1, 2026

तरुणाने घेतला गळफास

June 1, 2026

शहरात विविध ठिकाणी हातभट्ट्यांवर छापे

June 1, 2026

अखेर भाजपकडून राजेंद्र राऊतांना विधान परिषदेची उमेदवारी

June 1, 2026

चॅम्पियन चषक १३ वर्षाखालील राज्य निवड स्पर्धा  सोलापुरात ५ जूनपासून 

June 1, 2026
विठ्ठल मंदिरातील दर्शन बारीसाठी पाँली कार्बोनेटचावापर

विठ्ठल मंदिरातील दर्शन बारीसाठी पाँली कार्बोनेटचावापर

June 1, 2026
कोल्हापूरचा सिकंदर शेख ठरला ‘देवाभाऊ केसरी’चा मानकरी

कोल्हापूरचा सिकंदर शेख ठरला ‘देवाभाऊ केसरी’चा मानकरी

June 1, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

byतरुण भारत
May 31, 2026
0

टेंभुर्णी - (ता.माढा) येथे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या पदाधिकारी मेळावा व नवीन पदाधिकारी निवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या...

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0889185

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697