Wednesday, June 3, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

आहारात पौष्टिक तृणधान्याचा वापर आरोग्यासाठी फायदेशीर- काळे

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
September 30, 2023
in india
0
आहारात पौष्टिक तृणधान्याचा वापर आरोग्यासाठी फायदेशीर- काळे
0
SHARES
50
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

गेल्या 50 वर्षात आपल्या भारत देशाची भौतिक प्रगती खुप झाली. परंतु, आरोग्याच्या बाबतीत मात्र आपण कमी पडलो. भारताच्या ग्रामीण भागात 100 किलोचे पोते उचलणारा माणुस आज दिसत नाही. हरितक्रांतीमुळे अन्नधान्याच्या उत्पादनात वाढ झाली. परंतु, शरीराच्या सर्वांगीन पोषणाच्या बाबतीत दुर्लक्ष झाल्यामुळे ग्रामीण भागातील शारीरिक क्षमता कमी झाली आहे. याकरीता आहारात पौष्टिक तृणधान्याचा वापर करणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांनी केले.

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्ताने इट राईट मिलेट मेला या कार्यक्रमाचे आयोजन आंतरविद्या शाखा जलसिंचन व्यवस्थापन विभाग, सावित्रीबाई फुले माध्य मिक विद्यालय, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी आणि अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. नानासाहेब पवार सभागृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करतांना आयुक्त अभिमन्यू काळे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार होते. याप्रसंगी कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, नाशिक येथील अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त श्री. संजय नारागुडे, आंतरविद्याशाखा जलसिंचन व्यवस्थापन विभाग प्रमुख तथा सावित्रीबाई फुले शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. महानंद माने, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सुधाकर बोराळे, अहमदनगर येथील अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त भुषण मोरे, नाशिक येथील अन्न विभागाचे सहाय्यक आयुक्त मनीष सानप, नाशिक येथील शेतकरी फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे संचालक शशिकांत बोडके, आंतरविद्या शाखेचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. देविदास खेडकर, सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य अरुण तुपविहिरे, राहुरीचे कृषि अधिकारी बापुसाहेब शिंदे व राजेंद्र काळे उपस्थित होते.

 

अभिमन्यू काळे पुढे म्हणाले की अन्न व औषध प्रशासनातील अधिकारी उत्कृष्ट काम करीत असून अन्नाच्या संदर्भातील उद्योग उभारणी करण्यासाठी उत्सुक असलेल्या व्यक्तींना ते नेहमीच मदत करुन प्रोत्साहन देतात. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पौष्टिक तृणधान्यावरील सादरीकरण केलेल्या ईश्वरी तोडमल व भारुड तसेच पोवाडा सादर करणार्या राजेंद्र काळे यांचे त्यांनी विशेष कौतुक केले. शशिकांत बोडके म्हणाले की पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्व हा आपल्या निरोगी आरोग्यासाठी महत्वाचा विषय आहे.पूर्वी आपण गहू हा फक्त सणावाराला खायचो.परंतु सध्या त्याचे आहारातील प्रमाण वाढल्यामुळे त्यातील ग्लुटेनमुळे उच्चरक्त दाब, डायबेटीससारख्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. यावर उपाय म्हणजे तृणधान्याचे आहारात प्रमाण वाढविणे हाच होय. पौष्टिक तृणधान्याच्या व्यापारात अमर्याद संधी असून ज्वारी, बाजरी पिकविणार्या शेतकर्याला या व्यापारात सर्वात मोठी संधी आहे.मराठी माणसाने या उद्योगामध्ये जास्तीत जास्त संख्येने पुढे येवून उद्योगाची गुढी उभारुन या माध्यमातून भारताचे नांव जगात पुढे न्यावे असे त्यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरुवा तीला सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाची विद्यर्थीनी ईश्वरी तोडमल हिने पौष्टिक तृणधान्यावर सादरीकरण केले. कृषि विभागातील राजेंद्र काळे यांनी तृणधान्यावर पोवाडा व भारुड सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत डॉ. महानंद माने यांनी केले.यावेळी अहमदनगर येथील अन्न व औषध प्रशासन विभागाने आयोजीत केलेल्या पौष्टिक तृणधान्यावरील निबंध स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देवून गौरविण्यात आले. यामध्ये मोठ्या गटात अपुर्वा आवारी व लहान गटात सायली कांबळे यांनी प्रथम क्रमांक मिळविला. ईश्वरी तोडमल हिला यावेळी विशेष पारितोषीक देवून गौरविण्यात आले. याप्रसंगी निबंध स्पर्धेचे परिक्षण करणार्या शिक्षकांच्या चमुलाही गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जितेंद्र मेटकर यांनी केले.भुषण मोरे यांनी आभार मानले.

Post Views: 139
Previous Post

गणेश विसर्जनानंतर गिरगाव चौपाटीची एनसीसीकडून स्वच्छता

Next Post

‘वैद्यराज’ पोहोचले देश विदेशात

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
‘वैद्यराज’ पोहोचले देश विदेशात

'वैद्यराज' पोहोचले देश विदेशात

ताज्या बातम्या

७२ मेडल मिळवणारी गोल्डन कन्या श्रावणी सुर्यवंशीने पटकाविले आणखी 5 सुवर्ण पदक #viral #solapurnews

June 3, 2026

मार्केट यार्ड, जुने पुणे नाका ते छत्रपती संभाजी तलाव उड्डाण पुलाच्या कामासाठी सरसावले प्रशासन

June 3, 2026

सावधान भेसळ कराल तर कारवाई होणारच #solapurnews #viral

June 3, 2026

अरे वा …क्या बात है ! जर्मनीत शिका अन लाखो कमवा… #marathinews #news

June 3, 2026

सावधान भेसळ कराल तर कारवाई होणारच #solapurnews #news

June 3, 2026

लाडक्या बहिणींनो केवायसी पूर्ण केलं असेल तरच मिळतील पैसे #viral #news

June 3, 2026

जिथे पुरुष तिथे महिलांच्या बाळंतपणाची व्यवस्था कशी काय खासदार शिंदेनी अधिकाऱ्यांना विचारला जाब

June 3, 2026

आता शेतकऱ्यांना दोन लाखांची कर्जमुक्ती

June 3, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

byतरुण भारत
May 31, 2026
0

टेंभुर्णी - (ता.माढा) येथे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या पदाधिकारी मेळावा व नवीन पदाधिकारी निवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या...

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0892148

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697