बार्शी – लायन्स क्लब बार्शी रॉयल, तिरुपती ॲग्रो एजन्सीज, बिजांकुर सिडस देऊळगाव राजा यांच्या संयुक्ततेने या वर्षाच्या पोळ्यासाठी बळीराजाला थोडीफार मदत व्हावी या उद्देशाने जवळपास १५ शेतकऱ्यांना चालू हंगामातील प्रति शेतकऱ्यास दोन किलो या पद्धतीने एकूण ३० किलो बियाणे ६०,०००/- रुपये किंमतीचे मोफत कांदा बियाणे वाटप करण्यात आले. या सीझनमध्ये तिरुपती ॲग्रोने व लायन्स क्लब बार्शी रॉयल जुलै महिन्यामध्ये जवळपास ४० शेतकऱ्यांना मोफत सोयाबीन बियाणे वाटप केले होते. लायन्स क्लबचे अध्यक्ष लायन मंगेश बागुल हे सदैव शेतकऱ्यांच्या सेवेसाठी नवनवीन उपक्रम राबवत असतात. या वर्षातील पावसाने मारलेली दडी शेतकऱ्याच्या अतिशय जिव्हारी लागलेली आहे. त्याच्यामुळे त्यांना फूल न फुलाची पाकळी म्हणून या उपक्रमातून नक्कीच मदत होणार असून या मदतीसाठी तिरुपती ॲग्रो, बिजांकुर सीड्स यांचे क्लबला बियाणा वाटपात मोलाचे सहकार्य लाभलेले आहे. बिजांकुर सिडसचे पावसाळी आणि उन्हाळी असे दोघेही उत्कृष्ट दर्जाचे कांदा बियाणे मार्केटमध्ये उपलब्ध आहे.
या उपक्रमासाठी तिरुपती परिवारातील सदस्य रामकृष्ण चव्हाण, सेक्रेटरी दयानंद रेवडकर, खजिनदार उमेश जाधव व अध्यक्ष मंगेश बागुल व शेतकरी उपस्थित होते.