अकलूज – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुले नंबर दोन अकलूज या शाळेत पर्यावरण पूरक गणपती व बैल बनवणे कार्यशाळा संपन्न झाली. बैलपोळा निमित्त शाळेतील मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा. गणपती व बैल बनवण्याचे ज्ञान आवगत व्हावे यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदाशिवराव माने विद्यालय येथील कलाशिक्षक श्री तानाजी काशीद सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
बाप्पाच्या आगमनाची लागली मनाला आस, बैलपोळ्यांनी वाढवला शेताचा सुवास, सण आले एकत्र सुख-समृद्धी घेऊन , नमन करूया दोन्ही देवांना हात जोडून. हिंदु संस्कृतीमध्ये गणपती व बैलपोळा या सणाचे खूप महत्त्व आहे.भारतीय संस्कृतीचा वारसा जपण्यासाठी व मुलांना स्वनिर्मितीचा आनंद मिळावा म्हणून शाळेमध्ये पर्यावरण पूरक गणपती व बैल बनवणे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.या कार्यशाळेमध्ये मुलांच्या कल्पकतेला व सर्जनशीलतेला वाव मिळाला.
या कार्यशाळेसाठी माळशिरस तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी महेश गवळी, विस्ताराधिकारी सौ.भक्ती नाचणे मॅडम व केंद्राचे केंद्रप्रमुख सुरज कांबळे सर यांचे मार्गदर्शन लाभले.या कार्यशाळेमध्ये मुले नंबर दोन शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुकुमारी अंगुले मॅडम,श्रीमती मनिषा बळवंतराव मॅडम,तय्यब शेख सर,दत्तात्रय गायकवाड सर, श्रीमती अंजली अडाणे मॅडम, श्रीमती फातिमा मुलाणी मॅडम, श्रीकांत राऊत सर,श्रीमती हजराबी बांगी मॅडम या सर्वांचे सहकार्य लाभले. या कार्यशाळेसाठी विशेष सहकार्य सदाशिवराव माने विद्यालय अकलूज येथील मुख्याध्यापक श्री अमोल फुले सर यांचे लाभले.
Post Views: 12