Saturday, June 13, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

राष्ट्रवादी म्हणजे ‘विकास’ अन ‘प्रगती’ – अजित पवार

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 9, 2024
in top news
0
अजितदादांनी भर सभेत सांगितलं बारामती जिंकण्याचं गणित…!
0
SHARES
16
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर

मुंबई, 9 जुलै (हिं.स.)। विकासाचा दृष्टीकोन अन विकसित महाराष्ट्र ही आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आगामी विधानसभा निवडणूकांमध्ये महाराष्ट्रातील जनतेसमोर घेवून जायची आहे. आगामी विधानसभा निवडणूक आपल्या लोककल्याणकारी योजनांवरच आपण लढणार आहोत अशा स्पष्ट सूचना करतानाच अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या महिला, युवा, शेतकरी, वारकरी, दुर्बल, आदिवासी, मागासवर्ग आणि अल्पसंख्याक समाजासाठीच्या क्रांतिकारी योजना लोकांपर्यंत घेवून जा. असे स्पष्ट आदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाच्या बैठकीत दिले.
महिला आर्थिक विकास मंडळाच्या सभागृहात आजी-माजी आमदारांसह प्रदेश स्तरावरील विशेष निमंत्रितांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
आगामी निवडणूकांमध्ये आपण जी रणनीती आखली आहे. जे काम हाती घेतलेय त्यावरच आपण जनतेच्या समोर जाणार आणि जिंकणार आहोत असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, दिनांक १४ जुलै रोजी बारामती येथे पक्षाची जाहीर सभा आयोजित करण्यात आल्याची घोषणाही अजितदादा यांनी यावेळी केली.
आता आपण इतर बाबींकडे लक्ष देण्याऐवजी पहिल्यांदा लग्न निवडणूकीचे हे उद्दीष्ट नजरेसमोर ठेवून लढूया. असे आवाहनही अजित पवार यांनी यावेळी केले.
आपण अर्थसंकल्पात कृषीपंपाच्या वीजबिल माफीचा निर्णय घेतला. तो अनेकांना आवडला आहे. महिलांसाठी दरमहा दीड हजार रूपये या योजनेचे राज्यभरात स्वागत होत आहे. बळीराजाला कायम मोफत वीज मिळेल यासाठी मागेल त्याला सौर कृषीपंप अशी योजना आपण आणली आहे. सौरऊर्जेचे हे धोरण शेतकर्‍यांनी आनंदाने स्विकारले आहे. बहिणींसोबत भावंडांनापण या विविध योजनांचा लाभ होणार आहे हे सत्य जनतेच्या समोर मांडा. असे आवाहन अजित पवार यांनी यावेळी केले.
आपण आपल्या या योजनांचा प्रचार, प्रसार विधानसभा निवडणूकीच्या मतदानापर्यंत लावून धरायचा आहे. विरोधकांच्या कोणत्याही नकारात्मक प्रचाराला बळी न पडता आपण आपल्या सकारात्मक निर्णयावर जनतेच्या समोर जायचे आहे. असेही अजित पवार यांनी सांगितले.
मनुस्मृती कदापि मान्य नाही..!
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कायमच लोकशाहीवादी आणि समतेची भूमिका जपणारा पक्ष आहे. असे सांगताना अजितदादा पवार यांनी शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश होणार असेल तर तो आपल्या पक्षाला कदापि मान्य नाही. आपण कायमच मनुस्मृतीच्या विरोधात आहोत… आणि राहणार आहोत. शालेय शिक्षणमंत्री यांनी काही श्लोकांचा दाखला देत समर्थन केले असले तरी आपला पक्ष कधीही मनुस्मृतीला स्विकारणार नाही. असेही अजितपवार यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

*अर्थसंकल्पाने जनतेचा आत्मविश्वास वाढला – सुनिल तटकरे*
यंदाचा अर्थसंकल्प हा सर्वसमावेशक या शब्दाला समर्पक असून आपले नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या या अर्थसंकल्पाने जनतेच्या मनात महायुती सरकारबाबतचा आत्मविश्वास वाढला आहे. असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.

लोकसभा निवडणूकांमध्ये आपला पक्ष केवळ चार जागेवर लढला. त्यामधे एक जागा आपण जिंकली. मात्र अजितदादांच्या सोबत असलेल्या आपल्या आमदारांच्या विधानसभा मतदार संघात महायुतीच्या उमेदवाराला मताधिक्य दिले. लोकसभेत जे काही झाले ते झाले, असे सांगताना सुनिल तटकरे यांनी अजितदादा पवार यांनी यंदाच्या अर्थसंकल्पातून विरोधकांना ‘एकही मारा लेकीन साॅलिड मारा’ अशी टिप्पणी करत उपस्थितांची दाद मिळवली. यंदाचा अर्थसंकल्प हा आपल्या राष्ट्रवादी पक्षाचे लोककल्याणकारी ध्येय आहे. जनसामान्यांच्या प्रती असलेली ही भावना प्रत्यक्ष अर्थसंकल्पात धोरणांच्या रूपाने जाहीर करून राजकारणाच्या पलीकडील विकास आणि समाजकारण कसे असते याचे हे उदाहरण आहे. अशा शब्दात खासदार सुनिल तटकरे यांनी अर्थसंकल्पाचा गौरव करत अजित पवार यांचे आभार मानले.

महायुती सरकारने आपले कर्तव्य पार पाडले असून, आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शिलेदार म्हणून आपण अर्थसंकल्पातील सर्व योजनांचा सामान्य आणि गरजू लाभार्थ्यांपर्यंत लाभ मिळेल यासाठी पुढील दोन महिने रात्रंदिवस कार्यरत रहा. असे आवाहन सुनिल तटकरे यांनी यावेळी केले.

Post Views: 55
Previous Post

सामाजिक उपक्रमातुन बालाजी पाटील भायेगावकर यांचा वाढदिवस साजरा

Next Post

बारामतीत १४ जुलैला राष्ट्रवादी काँग्रेसची अभूतपूर्व जाहीर सभा – सुनिल तटकरे

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
बारामतीत १४ जुलैला राष्ट्रवादी काँग्रेसची अभूतपूर्व जाहीर सभा – सुनिल तटकरे

बारामतीत १४ जुलैला राष्ट्रवादी काँग्रेसची अभूतपूर्व जाहीर सभा - सुनिल तटकरे

ताज्या बातम्या

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी १४ जूनला ऑनलाईन योग सत्र

June 13, 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी

June 13, 2026
जिव्हाळा विद्यामंदिरात 23 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

जिव्हाळा विद्यामंदिरात 23 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

June 13, 2026
हप्ता खात्यात जमा पण वाळूचा प्रश्न कायम; घरकुल लाभार्थ्यांची अडचण 

 जिल्हा परिषदेत ९९ केंद्रप्रमुखांचे समायोजन शिक्षण व्यवस्थेला नवे बळ

June 13, 2026
टाटा मोटर्सच्या ईव्ही आणि एसयूव्हीच्या किमतीत १ जुलै २०२६ पासून वाढ

टाटा मोटर्सच्या ईव्ही आणि एसयूव्हीच्या किमतीत १ जुलै २०२६ पासून वाढ

June 13, 2026
हप्ता खात्यात जमा पण वाळूचा प्रश्न कायम; घरकुल लाभार्थ्यांची अडचण 

हप्ता खात्यात जमा पण वाळूचा प्रश्न कायम; घरकुल लाभार्थ्यांची अडचण 

June 13, 2026
पद्मशाली पुरोहित संघाच्या श्री विष्णू यागास प्रारंभ

पद्मशाली पुरोहित संघाच्या श्री विष्णू यागास प्रारंभ

June 13, 2026

१५ तोळे सोने व ४ लाख ८० हजार रोख रक्कम स्कुटीच्या डिकीतून लंपास

June 13, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

byतरुण भारत
June 12, 2026
0

सांगोला -    राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व आहे. त्यांचा विजय उमेदवारी जाहीर झाल्याच दिवशी निश्चित झाला असून आता केवळ...

सोलापुरात राजकीय ‘गेमचेंजर’ बैठक ; पवार गटाचे तीन आमदार महायुतीच्या दालनात !

byतरुण भारत
June 11, 2026
0

सोलापूर - विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर सोलापूरच्या राजकारणात अनपेक्षित घडामोडींना वेग आला असून, बालाजी सरोवर येथे झालेल्या एका बैठकीने नव्या राजकीय...

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

byतरुण भारत
June 10, 2026
0

सांगोला -  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि रोजगाराभिमुख शिक्षण देत फॅबटेक टेक्निकल कॅम्पसने सांगोल्याला राज्याच्या शैक्षणिक नकाशावर ठळक स्थान मिळवून...

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

byतरुण भारत
June 9, 2026
0

सोलापूर : भाजप- महायुतीचे विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी सोमवारी महापौर विनायक कोंड्याल यांची महापौर निवासस्थानी सदिच्छा भेट...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0907172

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697