Tuesday, July 28, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

व्हीपीके उद्योग समूह कवळे गुरुजी फाउंडेशन च्या वतीने आयोजित भव्य रक्तदान शिबीर व ५००० वृक्षलागवड तसेच आत्महत्या गृस्त कुटुंबियांना पिठाची गिरणी व शिलई चे वाटप .

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 17, 2024
in top news
0
व्हीपीके उद्योग समूह कवळे गुरुजी फाउंडेशन च्या वतीने आयोजित भव्य रक्तदान शिबीर व ५००० वृक्षलागवड तसेच आत्महत्या गृस्त कुटुंबियांना पिठाची गिरणी व शिलई चे वाटप .
0
SHARES
867
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

व्हीपीके उद्योग समूह कवळे गुरुजी फाउंडेशन च्या वतीने आयोजित भव्य रक्तदान शिबीर व ५००० वृक्षलागवड तसेच आत्महत्या गृस्त कुटुंबियांना पिठाची गिरणी व शिलई चे वाटप .

उमरी ( प्रतिनिधी ) कै.डॉ.शंकररावजी चव्हाण साहेब यांचा ‘जलसंस्कृतीचे जनक’ असा गौरवपूर्ण उल्लेख होतो. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही त्यांची घोषणा बोधवाक्य ठरली. अनेक प्रकल्पांच्या पूर्णतेसाठी त्यांनी भगीरथ प्रयत्न केल्यामुळे त्यांचे नाव ‘आधुनिक भगीरथ’ म्हणून घेण्यात येते. तसेच सचिवालयाचे ‘मंत्रालय’ असे नामकरण श्रद्धेय कै.शंकररावजी चव्हाण साहेब यांच्याच कारकिर्दित झाले. साहेबांच्या कार्यकाळात महाराष्ट्राची भरीव प्रगती झाली. त्यांनी आपल्या हयातीत डोंगराएवढी कामे केली,

परंतु त्या कामाचा गाजावाजा केला नाही “काम करताना निष्ठा व श्रद्धांशी तडजोड केली नाही” त्यांचे व्यक्तिमत्त्व, नेतृत्व आणि कर्तृत्व समाजाला सदैव सर्जनशीलतेची, उद्यमशीलतेची आणि सुसंस्कारांची सदोदित प्रेरणा देत राहील… !
जलप्रणेत्यास आधुनिक महाराष्ट्र राज्याच्या जडणघडणीच्या शिल्पकारास जयंती निमित्ताने नायगांव विधानसभा मतदार संघाचे लोककल्याणकारी शेतकरी नते मारोतराव कवळे गुरुजी यांच्या नियोजनानुसार

आज वाघलवाडा ता.उमरी येथे मराठवाड्याचे भाग्यविधाते,जलक्रांतीचे जनक श्रद्धेय डॉ.शंकररावजी चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त महारक्तदान शिबिर,5000 हजार वृक्ष लागवड, आणि आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांना कुटुंबीयांना शिलाई मशिन आणि पिठाची गिरणी वाटप करण्यांत आले यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन राज्याचे माजी मंत्री तथा अध्यक्ष नां.जि.म.स.बँक यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जिल्ह्याचे माजी खासदार मा.प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थीतीत संपन्न झाला.

या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी माजी खासदार नांदेड चे लोकप्रिय लोकनेते प्रतापराव पाटील चिखलीकर बोलताना म्हणाले मारोतराव कवळे गुरुजी यांच्या विकासात्मक कार्याचा आढावा घेत असताना गुरुजी राबवत असलेल्या उपक्रमाची प्रशंशा केली. निवडणुका येतात जातात हार जीत होत राहते परंतु कायम जनतेमध्ये राहून जनतेची कामे जनसामान्यांच्या उपयोगाला येणारा नेता म्हणजे कवळे गुरुजी असे उद्गार हे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी यावेळी केले.

आत्महत्याग्रस्त कुटुंबांचा आपुलकीने व माणुसकीने विचार करणारा गुरुजी फाउंडेशनच्या माध्यमातून उदरनिर्वाहासाठी त्यांच्या कुटुंबाला पिठाची गिरणी व शिलाई मशीन देण्याचा गुरुजींचा निर्णय हा निश्चितच मानवता धर्म शिकवणारा निर्णय आहे. असेही यावेळी चिखलीकर यांनी म्हटले. रस्ते नाल्या करणे म्हणजे मतदार संघाचा विकास नाही तर प्रत्यक्ष जनसामान्यांच्या घरामध्ये उपजीविकेचे व रोजगाराची निर्मिती करून देणे हा खरा विकास आहे.

आणि तो कवळे गुरुजींच्या माध्यमातून पूर्ण होताना नायगाव विधानसभेमध्ये दिसत आहे.असेही यावेळी प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केले.
यानंतर बिलोली पंचायत समितीचे माजी सभापती अशोकराव पाटील मुगावकर यांचे मनोगत झाले तुफान फटकेबाजी करत अशोकराव पाटील मुगावकर यांनी नायगाव विधानसभेमध्ये सद्यस्थितीला काय चालू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये कवळे गुरुजी सारख्या नेतृत्वाला जर सर्वांनी आशीर्वाद दिला तर निश्चितच एक नव शेतकऱ्यांचे हित जोपासणारा नेतृत्व या मतदारसंघात उदयास येऊ शकते.

असे मत व्यक्त करताच उपस्थितांमधून टाळ्यांचा कडकडात झाला व सर्व उपस्थित व्यासपीठावरील मान्यवरांनी त्यांच्या ह्या मागणीला प्रतिसाद दिला.नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात खासदार अशोकराव चव्हाण माजी खासदार भास्करराव पाटील व माजी खासदार प्रतापराव पाटील या तिघांनी जर समन्वयाने एकत्र काम केले तर निश्चितच येणाऱ्या काळात नांदेड जिल्ह्यामधील नऊ पैकी सात आठ विधानसभा विजयी करण्याचं लक्षही त्यांनी साध्य होईल असे सांगितले. कवळे गुरुजी यांच्यामध्ये जनसामान्याचा नेता आणि शेतकऱ्यांचा उद्घाता होण्याचे सर्व गुण आहेत. पतसंस्था, दूध डेरी,साखर कारखाना,गुळ कारखाना यांच्या माध्यमातून ४५०० बेरोजगारांना रोजगार देत हजारो कुटुंबांमध्ये आशेचा किरण निर्माण करण्याचं काम मारोतराव गुरुजी यांनी केलेलं आहे.येणारा काळात या मतदारसंघातून त्यांना खूप मोठी संधी आहे असेही अशोक पाटील मुगावकर म्हणाले.

यानंतर बालाजी बच्चेवार यांनीही शंकररावजी चव्हाण यांच्या कार्याचा आढावा घेत कवळे गुरुजी यांनी राबवलेल्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.खा भास्करराव पाटील खतगावकर यांनी कवळे गुरुजींच्या कार्याची प्रशंशा करत कै. लक्ष्मणराव हसेकर यांनी या भागामध्ये पाहिलेले स्वप्न कवळे गुरुजी यांच्या रूपाने पूर्ण होत आहे याचा उल्लेख करत असताना स्वर्गीय शंकररावजी चव्हाण यांच्या समवेत काही आठवणी ही उपस्थितांच्या समोर सांगितल्या अत्यंत कडाक अशीच तिचे आणि वेळेला महत्त्व देणारे कै. शंकरराव चव्हाण यांच्या तालमीमध्ये आपण तयार झालो असून अटल बिहारी वाजपेयी मनमोहन सिंग अशा पंतप्रधानांच्या कार्य काळामध्ये आपल्याला काम करण्याची संधी मिळाली असाही उल्लेख त्यांनी केला

मारोतराव कवळे गुरुजी गोरगरीब शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करणारा नेता आहे जनसामान्य शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये वाढ झाली पाहिजे शेतीला जोडधंदा म्हणून पूरक व्यवसाय निर्माण करत दुग्ध व्यवसायाला चालना देण्याचे काम कवळे गुरुजी करत आहेत त्यांच्या या कार्याला आमच्या शुभेच्छा आहेत निश्चितपणाने कवळे गुरुजी सारख्या उद्योगपतीच्या पाठीमागे उभा राहण्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे असेही मा.खा भास्करराव पाटील खतगावकर यांनी व्यक्त केले त्यांचे भाषण चालू असताना पावसाचे आगमन झाल्याने शेतकरी सुखावला असून शेतकऱ्यांनी त्याच्या कार्यक्रमाला पावसाने सुद्धा हजेरी लावली असेही भास्करराव पाटील खतगावकर म्हणाले.

यावेळी परिसरातील असंख्य शेतकरी बांधवांची उपस्थिती होती शेतकऱ्यांमधून कवळे गुरुजी यांच्या विषयी आत्मीयतेचे भाव प्रकट होत होते तिन्ही तालुक्यातील पत्रकार बांधवांचाही यथेचीत सन्मान करण्यांत आला यावेळी करण्यात आला उपस्थित शेतकऱ्यांनी कवळे गुरुजींच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या उपक्रमाचेही मनापासून कौतुक केले आणि कवळे गुरुजीला धन्यवाद दिले या कार्यक्रमानंतर सर्वांसाठी सुरुची भोजनाची व्यवस्था ही करण्यात आली होती एकंदरीत परिसरातील शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेणारा लोकनेता म्हणून कवळे गुरुजी यांनी स्वर्गीय शंकररावजी चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त घेतलेल्या या कार्यक्रमाचे मात्र मतदारसंघांमध्ये जोरदार चर्चा होत असून येणाऱ्या आगामी विधानसभेची जोरदार तयारी गुरुजीच्या माध्यमातून केली जाते अशीही चर्चा यावेळी रंगण्यात आली आणि जर भारतीय जनता पक्षाच्या वतीने मारोतराव कवळे गुरुजींना उमेदवारी मिळाली तर निश्चितच गुरुजी सक्षमपणे या मतदारसंघाचे नेतृत्व करू शकतात असाही सूर उपस्थित शेतकऱ्यांमधून उमटत होता.

यावेळी उपस्थीत माजी उपमहापौर सरजीतसिंग गिल,अशोक पाटील मुगावकार,श्रावण पाटील भिलवंडे,माणिकराव लोहगावे,बालाजी बच्चेवार,आनंदराव बिराजदार गुरुजी,संजय कुलकर्णी,नागभूषण वर्णी,सुधाकर देशमुख,अशोक पाटील वडजे,अमोल पाटील ढगे,सुभाष पेरेवार,पिराजी पाटील चव्हाण,धनराज शिरोळे,पारसमल दर्डा,प्रभाकर पाटील पुयड,बापूराव पाटील करकाळेकर, संजय पा शेळगांवकर,गणेशराव पाटील सर्से, लुकमान बेग, गायकवाड,शिवराज पाटील गाडीवान,राजीव पाटील बोळसेकर,राजू गंदीगुडे,बाबू नाईक, वसंत जाधव,संजय पाटील शेळगावकर,शिवाजी पाटील,सचिन डांगे,विलास पाटील नरवाडे,संतोष पाटील सरसे,पंजाब पाटील पवळे,आनंदराव पाटील भायेगांवकर,भगवान पा चव्हाण,श्रीनीवास पा ढगे,माधवराव पा ढग,पांडुरगजी गळगे,आनंदराव पा सावंत,चंदु पा चव्हाण,दत्ता पाटील होटाळकर,लक्ष्मणराव पा हारेगांवकर,हरीभाऊ गोरठेकर,रोषनगांवकर महाराज,शीवाजी पा बाभळीकर,सचीन पा डांगे,अनील पा वडजे, कारखान्याचे जि.एम.एस.जी.अंबटवाड,शेतकी अधिकारी पि.एम.पवार साहेब, शेतकी अधिकारी शेख रफीक,व्हिपीके पतसंस्थेचे सचिव नागनाथ पांचाळ, पतसंस्थेचे सिईओ अण्णाराव शिंदे साहेब, इंजिनिअर बालाजीराव येंडाळे,ओएस कदम साहेब, ऊस विकास अधिकारी बी.एम.पडवळे,तसेच या गुरुजी फांउडेशन सर्व संचालक व अध्यक्ष संदीप पाटील कवळे,परमेश्वर पाटील कवळे,पुजा पाटील कवळे आदी जन उपस्थित होते.

याप्रसंगी कार्यक्रमाच सुत्रसंचलन भास्कर पा मनुरकर तर आभार यु.जी.कदम सर यांनी मानले कार्यक्रमास नायगाव,उमरी आणि धर्माबाद तालुक्यातील बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Post Views: 71
Previous Post

विठ्ठलनामाची शाळा भरली

Next Post

पांडूरंगाच्या चरणी अफाट जनसागर उसळला

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
पांडूरंगाच्या चरणी अफाट जनसागर उसळला

पांडूरंगाच्या चरणी अफाट जनसागर उसळला

ताज्या बातम्या

सकल दिगंबर जैन वधू वर पालक परिचय सप्तपदी मेळावा सोलापूरात उत्साहात संपन्न

July 28, 2026

सोलापूर विमानतळाच्या नाईट लँडिंगसाठी हालचालींना वेग आला

July 28, 2026

उजनी धरण स्थानिक पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस झाल्याने व पाण्याची आवक वाढली

July 28, 2026

संदीप देशपांडेच्या टी शर्टवर दुतर्फा मतांनी मारा

July 28, 2026

गुरव समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा

July 27, 2026
उजनीचे पाणी इंगळगी-शिरवळ धुबधुबी तलावात सोडा!

उजनीचे पाणी इंगळगी-शिरवळ धुबधुबी तलावात सोडा!

July 27, 2026

सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या ‘लिटल चॅम्प’ क्रिकेट स्पर्धेचा दिमाखात बक्षीस समारंभ उत्साहात

July 27, 2026
हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या संचालकपदी पाचजण बिनविरोध

हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या संचालकपदी पाचजण बिनविरोध

July 27, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1007500

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!