मुदखेड येथे अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पत्रकारांना रेनकोट वाटप
मुदखेड ता प्र
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाध्यक्ष इजिनियर विश्वंभर पाटील पवार यांच्याकडून मुदखेड येथील शासकीय विश्रामगृह येथे तालुक्यातील पत्रकारांना पावसापासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी रेनकट देऊन अजित दादा पवार व सुनील तटकरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
लोकशाहीचे चौथे अंधारस्तंभ समजले जाणारे पत्रकार हे ऊन पाऊस किंवा थंडीमध्ये आपल्या कर्तव्य बजावत असतात व त्यांना पावसाळ्यात जिथे घटना घडली त्या ठिकाणी रात्री बे रात्री पावसात घडलेल्या घटनेचा आढावा घेण्यासाठी जावे लागते, सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने त्यांना पावसाळ्यात देखील आपली पत्रकारिता करण्यासाठी पावसात बाहेर निघावे लागते.
हे पाहून इजिनियर विश्वंभर पाटील पवार यांनी त्याच पावसाचा बचाव करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्टीच्या वतीने पत्रकारांना वर्षा संरक्षण किट म्हणजे रेनकोट देऊन मुदखेड पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. राष्ट्रवादी पार्टीच्या वतीने देण्यात आलेल्या रेनकोट मुळे पत्रकारांना वर्षापासून बचाव होण्यास मदत होणार आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मुदखेड तालुक्यातील सर्व पत्रकारांना रेनकोट दिल्याबद्दल पत्रकारांनी त्यांचे आभार व कौतुक केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला जिल्हाध्यक्षा नांदेड सौ.पूजाताई माधव व्यवहारे,मराठी पत्रकार सांघाचे तालुकाध्यक्ष सिद्धार्थ चौदंते, उपाध्यक्ष नामदेव बिच्चेवार, तालुका सचिव साहेबराव गागलवाड, कार्याध्यक्ष दिनेश शर्मा,
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक कार्याध्यक्ष नांदेड हनुमंत पाटील नटूरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुदखेड कार्याध्यक्ष शंकर पाटील डोणगावकर, मुदखेड शहराध्यक्ष मोहम्मद बुरान,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक भोकर तालुकाध्यक्ष दर्शन पाटील डुरे सायाळकर,महिला आघाडी मुदखेड शहराध्यक्ष सौ.रुक्मिणी कुंचटवाड, ज्ञानेश्वर गायकवाड,
ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष नांदेड गजानन बोडके,सोशल मीडिया जिल्हा उपाध्यक्ष नांदेड माधव व्यवहारे, सोशल मीडिया तालुकाध्यक्ष भोकर सचिन सुंळे नांदेकर,गंगाधर कुंचटवाड, प्रदीप ढगे,दिलीप सरोदे,शेख इरफान युवक विधानसभा अध्यक्ष ,रामा गुंजकर,शेख साजिद युवक जिल्हा उपाध्यक्ष, शेख इरफान अल्पसंख्यांक शहराध्यक्ष,शेख हकीम शहर उपाध्यक्ष ,विनायक देशमुख,राजू गायकवाड, शेख मुखीद अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष,बबन गायकवाड शहर उपाध्यक्ष ,बालाजी बिंदगे, आनंदा निखाते, संतोष दर्शनवाड, मोहम्मद इम्रान, गोपाल सूर्यवंशी यांच्यासह मुदखेड तालुक्यातील व शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.